पुन्य वार्ता
ब्राम्हणवाडा, प्रतिनिधी:
समाजसेवा आणि दानधर्माच्या कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी अखंड हरिनाम सप्ताह, दत्तवाडी येथे सप्ताहाच्या निमित्ताने दोन क्विंटल साखर दान केली. त्यांनी या सप्ताहाला काही दिवसांपूर्वी भेट दिली होती, त्यावेळी विश्व हिंदू परिषद सहमंत्री मा. शंकरजी गायकर साहेबांचा सत्कार करताना त्यांनी दोन क्विंटल साखर देण्याचे आश्वासन दिले होते. या शब्दाला जागत, त्यांनी २ फेब्रुवारी रोजी दोन क्विंटल साखर मंडळाच्या ताब्यात दिली.
ग्रामस्थांकडून डॉ. विश्वासराव आरोटे यांचा मनःपूर्वक सत्कार,
या समाजोपयोगी कार्याबद्दल गुरुदत्त सेवा मंडळ दत्तवाडी आणि दत्तवाडी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले. गुरुदत्त सेवा मंडळाचे अध्यक्ष भगवान गायकर यांनी सांगितले, “डॉ. विश्वासराव आरोटे यांनी समाजसेवेचा जो वसा घेतला आहे, तो खरोखरच प्रेरणादायी आहे. अशा दानशूर व्यक्तींच्या सहकार्यानेच धार्मिक आणि सामाजिक उपक्रम यशस्वी होतात.”
“संत-महात्म्यांमुळेच आपला भारत देश टिकून आहे” – डॉ. आरोटे
साखर दान करताना डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, “संत-महात्म्यांच्या उपदेशांमुळेच आपला भारत देश टिकून आहे. संतांची शिकवण आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरांचे जतन करणे आवश्यक आहे. आपण वेळोवेळी समाजाला मदत केली पाहिजे आणि दानधर्म केला पाहिजे. समाजातील दुर्बल घटकांना आधार देणे हेच खरे धर्मकार्य आहे.”
सतत समाजसेवेत कार्यरत,
डॉ. विश्वासराव आरोटे यांचे योगदान केवळ पत्रकारितेपुरते मर्यादित न राहता ते वर्षभर विविध समाजसेवा उपक्रम राबवत असतात. त्यांच्या अनेक उपक्रमांपैकी काही महत्त्वाचे उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत –
१) विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे उपक्रम:
एक लाख वह्यांचे वाटप – शिक्षणास मदत करणारा महत्वाचा उपक्रम.
शालेय वस्तूंचे वितरण – गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेन, दप्तर, गणवेश आदी साहित्य दिले जाते.
२) गरीब व गरजूंसाठी मदतीचा हात:
कामगार, मजूर आणि गरीब स्त्रियांना साड्या, स्वेटर आणि कपड्यांचे वाटप.
अनाथ आश्रम, वृद्धाश्रम आणि गरजू कुटुंबांना किराणा सामान वाटप
गरजू पत्रकारांसाठी आर्थिक मदत व किराणा तसेच अन्य मदतीचे वाटप,
३) धार्मिक व सामाजिक कार्य:
विविध दिंड्यांचे स्वागत आणि सहकार्य.
अखंड हरिनाम सप्ताह, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमांना मदतीचा हात.
सामाजिक कार्याचा आगळा-वेगळा मार्ग,
विशेष म्हणजे, डॉ. विश्वासराव आरोटे यांचे पत्रकार प्रतिनिधी त्यांच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी वेगळ्या पद्धतीने समाजसेवा करतात. वाढदिवसानिमित्त ते विविध शाळांमध्ये जाऊन गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, गणवेश तसेच खाऊचे वाटप, दवाखान्यांमध्ये रुग्णांसाठी फळे, मिठाई आणि कपड्यांचे वाटप करतात, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांमध्ये जाऊन गरजूंसोबत वेळ घालवतात व आवश्यक मदत करतात.
दानशूर वृत्ती आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श,
डॉ. विश्वासराव आरोटे यांचे कार्य हे केवळ दानधर्मापुरते मर्यादित नाही तर त्यामध्ये सामाजिक बांधिलकी आणि समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करण्याचा उदात्त हेतू आहे. त्यांच्या समाजसेवेचा वसा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. समाजातील अशा दानशूर व्यक्तिमत्त्वांमुळेच सामाजिक ऐक्य आणि माणुसकीचा झरा अविरत वाहत राहतो.

✍🏻पत्रकार: संजय भाऊ गायकर
