पुण्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील हिवरगाव आंबरे ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी सामाजिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणारे युवा नेतृत्व, पाचगाव पाणीपुरवठ्याचे व्हाईस चेअरमन, युवा नेतृत्व आदरणीय अमोल अशोकराव ठुबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शांत संयमी व नेहमी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणारे नेतृत्व म्हणून आढळा परिसरात ओळख निर्माण करणारे युवा नेतृत्व अमोल ठुबे यांच्यावर अकोले तालुक्यातुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. निवडी वेळी सरपंच शांताबाई मेंगा ळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नाना नाईकवाडी, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक बादशाह बोंबले हिवरगाव कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब कुरकुटे संग्राम आंब्रे कावेरी बोंबले पुनम मोरे माया आंब्रे रूपाली कदम अनिल आंब्रे,अरुण नाईकवाडी जनार्दन आंब्रे, बाळासाहेब देशमुख संतोष नाईकवाडी महेश ठुबे दत्तात्रय कदम संपत बोंबले सोमनाथ बोंबले संदीप कदम गणेश कदम सुनील आंब्रे अक्षय बोंबले संजय ठुबे भाऊसाहेब बोंबले आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
