पुन्य वार्ता
अकोले:
अकोले तालुक्यातील आदिवासी व वारकरी संप्रदायातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, थाळ्याचीवाडी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गांवकरी समूहातर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा आधार मिळाला आहे.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे विशेषत्वाने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अकोले तालुक्यातील नामवंत उद्योजक राजेंद्र महाले, थाळ्याचीवाडी शाळेचे मुख्याध्यापक लता दगडू धादवड आणि विठ्ठल निलूराव चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि अशा सामाजिक उपक्रमांमुळे गरजू विद्यार्थ्यांना मदत मिळत असल्याचे सांगितले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि दैनिक समर्थ गांवकरी समूहाने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


