पुन्य वार्ता
संगमनेर ( दि. २०, प्रतिनिधी )
‘ एफडी तोडो , म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो ‘ आणि ‘ सपनोंको स्किप नही, एसआयपी करो !’ असा संदेश देणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्टॉलला संगमनेरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.
मालपाणी लॉन्स येथे दि.१६ ते २२ जानेवारी पर्यंत सफायर बिझनेस एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. धम्माल, मस्ती, मनोरंजनाबरोबरच संगमनेरकरांनी मुलांचे शिक्षण, लग्न, पेन्शन सारख्या काही अल्पकालीन व दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून संपत्ती निर्माण करण्याकरिता कडलग इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधींशी चर्चा केली व भविष्यकालीन उपायोजनांकरिता क्यू आर कोड स्कॅन करून आपले नाव नोंदविले.
‘ एफ डी तोडो , म्युच्युअल फंड स्वॅप से नाता जोडो ‘ आणि
‘ सपनोंको स्किप नही, एसआयपी करो !’ या कडलग इन्व्हेस्टमेंटच्या स्लोगनला संगमनेरकरांनी
दाद दिली. सद्यस्थितीत बँक मुदत ठेवींचे व्याजदर खूपच कमी झालेले आहे. जिल्हाभरामध्ये पतसंस्थांच्याबाबत विश्वसनीय वातावरण न राहिल्यामुळे महागाईवर मात करण्यासाठी सक्षम ठरलेल्या म्युच्युअल फंडांना गुंतवणूकदार भरभरून पसंती देत आहेत. या क्षेत्रात ग्राहकांचे हित, सचोटी, पारदर्शकता, विश्वासार्हता या कसोटींना उतरून ब्रँड ठरलेल्या कडलग इन्व्हेस्टमेंटला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे. एकरकमी गुंतवणूक ,एसआयपी गुंतवणूक , टर्म इन्शुरन्स, आरोग्य विमा , मानवी जीवनाची किंमत या गोष्टींचा विचार करून आर्थिक नियोजन करून देणाऱ्या विश्वासनीय सल्ल्यासाठी अनेकांनी स्टॉलवर नाव नोंदणी केली. संपत्ती निर्माणाची २८ वर्षांची विश्वासार्ह व समृद्ध परंपरा असलेल्या व अर्थ, आरोग्य आणि अध्यात्म ही मूल्ये जपणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटचा या एक्स्पोमध्ये क्रमांक दहा हा स्टॉल आहे.
‘ म्युच्युअल फंड सही है ‘ असा विश्वास संगमनेरकरांमध्ये निर्माण करणाऱ्या कडलग इन्व्हेस्टमेंटमध्ये १५० कोटींच्या संपत्तीचे म्युच्युअल फंड्स मध्ये उत्कृष्ट व्यवस्थापन केले जात आहे. समाजामध्ये आर्थिक साक्षरता निर्माण व्हावी म्हणून कडलग इन्व्हेस्टमेंटचे संस्थापक सुनील कडलग यांनी महाराष्ट्रभर व्याख्याने दिली असून वृत्तपत्रांमधून लिखाणही केले आहे.
‘ चला अर्थ साक्षर होऊयात ‘ या त्यांच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांना इंडियन ग्लोरी अवार्ड राष्ट्रीय गुणवत्ता पारितोषिकाने नवी दिल्ली येथे २०२३ मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.
कडलग इन्व्हेस्टमेंटचे आदित्य सुनील कडलग यांना टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचा कोर्ट ऑफ डी टेबल ( सीओटी ) २०२५ हा अवॉर्ड जाहीर झाला असून मियामी बीच, फ्लोरिडा येथे होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला आहे. आदित्य यांच्या माध्यमातून कडलग इन्व्हेस्टमेंटची दुसरी पिढी ही आर्थिक नियोजनाकरीता दमदारपणे कार्यरत झाल्याचा संदेश या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.
या सफायर बिझनेस एक्सपो नंतर
कडलग इन्व्हेस्टमेंटच्या टॉप टेन येथील कार्यालयास भेट देऊन संपत्ती निर्माणच्या परंपरा ग्राहकांनी समजून घ्याव्यात व आरोग्य विमा, टर्म इन्शुरन्स इत्यादी संदर्भातही मार्गदर्शन मिळवावे असे आवाहन कडलग इन्व्हेस्टमेंटचे व्यवस्थापक शुभम सोमवंशी व उपव्यवस्थापक सुरज म्हस्के यांनी केले आहे.
कडलग इन्व्हेस्टमेंटचा क्यू आर कोड स्कॅन करून आर्थिक नियोजनाची चर्चा करण्याकरता नागरिकांनी आपली वेळ नोंदवावी असे आवाहन
अर्चना सरोदे, स्वाती सरमाडे, मानसी घटे, प्रियंका पाटील, मयुरी देशमुख यांनी केले आहे.

