पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत खुर्द येथील शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले.यामध्ये अध्यक्ष म्हणून श्री योगेश पांडुरंग जाधव आणि उपाध्यक्ष म्हणून सौ . प्रियंका प्रविण गोडसे यांची निवड एकमताने करण्यात आली आहे. तसेच सदस्य म्हणून श्री अंकुश गोडसे, श्री भारत गोडसे,सौ राजश्री गोडसे,सौ अश्विनी मिंढे, सौ शितल शिंदे,सौ अलका बर्डे यांची निवड एक मताने करण्यात आली.या निवडी प्रसंगी गावचे प्रथम नागरिक सरपंच सौ. अनिता ताई गोडसे, डॉ किशोर गोडसे, पोलिस पाटील श्री विकास गोडसे, श्री रविंद्र गोडसे, श्री प्रविण मिंढे, श्री प्रविण गोडसे उपस्थित होते. पुनर्गठन झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांना शुभेच्छा दिल्या.नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी आम्ही शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत.पुढील दोन वर्षात आम्ही शाळेच्या सर्व गरजा गावकरी आणि ग्रामपंचायत च्या मदतीने पुर्ण करु अशी ग्वाही दिली.

