पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी): तालुक्यातील वीरगाव येथील आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट संचलित आनंदगड शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे यांना व्हिएतनाम येथे एका शानदार समारंभात “दि रायझिंग स्टार अवार्ड “ ने सन्मानित करण्यात आले.
व्हिएतनाम येथील नांग सिटी येथे व्हिएतनाम पर्यटन केंद्राच्या उपसंचालिका माई थी थान यांच्या हस्ते तर संपादक शैलेंद्र तनपुरे, अमोल घावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी विश्व हाईटेक नर्सरी चे संचालक वीरेंद्र थोरात उपस्थित होते.
ग्रामीण आदिवासी भागात आनंदगड शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून प्राथमिक ते उच्च शिक्षण तसेच वैद्यकीय व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना हक्काचे शैक्षणिक संकुल सामाजिक बांधिलकी जपत असल्याबद्दल श्री वाकचौरे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या पुरस्कारा बद्दल खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, अकोल्याचे माजी आमदार वैभव पिचड,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जालिंदर भोर,शिवाजी राजे धुमाळ,मा जि प सदस्य बाजीराव दराडे,अरुण शेळके, जगनशेठ देशमुख,अमृतसागर चे संचालक आप्पासाहेब आवारी, आनंदराव वाकचौरे, शरद चौधरी, रामदास आंबरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे,परबतराव नाईकवाडी, भाऊसाहेब वाकचौरे, बाळासाहेब मुळे, अरुण कराड,विजय वाघ, जयवंत थोरात, अनिल डोळस, आनंदगड चे सचिव अनिल रहाणे, विश्वस्त सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे, शिवराज वाकचौरे,प्राचार्या पल्लवी फलके, प्राचार्य किरण चौधरी, प्रा मिलिंद सुर्वे, प्रा विद्याचंद्र सातपुते, प्रा संदीप थोरात , सीमा दिघे, साहेबराव नवले,सुनिल वाकचौरे, अक्षय रहाणे, वर्षा नेहे वीरगाव ग्रा. प सदस्य, सोसायटी संचालक व कर्मचारी , शिवतेज दूध संस्था, आनंदगड संकुलातील सर्व शिक्षक व कर्मचारी या सर्वानी त्यांचे अभिनंदन केले आहे.


