पुण्य वार्ता
शिर्डी प्रतिनिधी
जागतिक महिला दिनानिमित्त शिर्डी पोलीस स्टेशन येथे आर्ट ऑफ लिविंग परिवाराने पोलीस महिला कर्मचाऱ्यांसाठी योगा प्राणायाम ध्यान असे सत्र आयोजित केले होते त्याचबरोबर पोलीस महिलांचा सन्मानही करण्यात आला परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाने लोणी येथील आर्ट ऑफ लिविंगच्या प्रशिक्षिका श्रीमती सुनीता तांबे यांनी पोलीस महिला हे जीवन खूप धावपळीचे असते त्यांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते त्यांनी रोज स्वतःला थोडा वेळ देऊन योगा प्राणायाम ध्यान सूर्यनमस्कार करून आपले आरोग्य कसे चांगले ठेवता येईल व तणावमुक्त जीवन कसे जगता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे आपले आरोग्य चांगले राहिले तरच आपण आनंदी होऊन काम करू शकतो असे मोलाचे मार्गदर्शन पोलीस महिलांना केले त्यांच्याबरोबर आर्ट ऑफ लिविंग चे प्रशिक्षक गणेश मुसमाडे यांनीही महिलांना काही प्राणायामाचे व ध्यानाचे प्रकार शिकविले तसेच आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने सर्व पोलीस महिलांचा सन्मानही करण्यात आला तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने सर यांनी श्रीमती सुनिता तांबे व गणेश मुसमाडे यांचा पोलीस स्टेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी पीआय रणजीत गलांडे सर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रासकर मॅडम, श्री पंढरीनाथ पगार उपस्थित होते
