पुन्य वार्ता
संगमनेर प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भाग जास्त प्रमाणात महावितरण चा मनमानी कारभार चालू झाला आहे असे दिसून येत आहे कधीही लाईट जाते कधीही येते त्यामुळे व्यवसायिक, शेतकरी वर्ग सर्वसामान्य नागरिक संतप्त झालेले आहे वेळेत लाईट बिल भरून सुद्धा लाईट वेळेला नसते याचा खेद वाटत आहे. वाढते मीटर भाडे वाढते रिडींग रेट नागरिक लाईट बिल भरताय पण त्यांना लाईट मिळत नाही संगमनेर अकोले सिन्नर भागात आज लाईट चा मोठा परिणाम दिसून येत आहे. महावितरण चे अधिकारी मेंटेनन्स चे कारण सांगून दिवस दिवस लाईट बंद ठेवताय त्यामुळे व्यापारी वर्गाचा व्यवसाय दिवसभर बंद राहतो याचा परिणाम त्यांच्या धंद्यावर होत आहे शेतकऱ्याला वीजबिल माफ केलंय पण लाईट नाही मग काय त्या लाईट चा काय उपयोग हा विषय जर थांबला नाही तर रस्ता रोको करुन वीजबिल कोणीही भरू नका असे आवाहन करण्यात येईल.मग थकबाकी झाल्यावर महावितरण अडचणीत येऊ शकते याचा विचार आपण करावा लोकांना पर्याय म्हणून सौर ऊर्जेकडे वळतील मग महावितरण कंपन्या बंद पडतील त्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल अनेक रोजगार जातील याला जबाबदार आपली यंत्रणा असेल. म्हणून आपण वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा थांबवा व पूर्णवेळ लाईट द्या तरच नागरिक लाईट बिल भरतील याची नोंद घ्यावी असे सामाजिक कार्यकर्ते दिपक वर्पे यांनी ऊर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्राद्वारे सांगितले आहे.

