पुन्य वार्ता
लिंगदेव (प्रतिनिधी ) – अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे उद्योग बाबासाहेब दळवी यांनी स्मशानभूमी सभामंडप व व्यासपीठाचे काम पूर्णत्वास नेऊन गावातील सर्वसामान्य लोकांसाठी खुले करून दिले पूर्वी श्रमदान व लोक वर्गणीतून विकास कमी होत असे त्यानंतर शासनाच्या माध्यमातून लोक प्रतिनिधी म्हणून आमदार खासदार ही कामे करत असतात आम्ही कोणी नाही तर आम्ही जनतेचे सेवक आहोत आम्ही फक्त वाढण्याचे काम करतो सामाजिक बांधिलकी ठेवून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून उद्योजक बाबासाहेब दळवी व सौ मीनाक्षी दळवी यांनी गावासाठी केलेले काम नवीन पिढीस समाज उपयोगी असल्याचे गौरवोदगार नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी काढले .
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी यांचे भूमिपुत्र बाबासाहेब कारभारी दळवी यांनी गावासाठी स्वतःच्या उत्पन्नातून बांधून दिलेल्या स्मशानभूमी सभा मंडप व व्यासपीठ लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी खासदार वाजे होते यावेळी बोलताना माजी आमदार सुधीर तांबे यांनी नोकरीच्या पाठीमागे न धावता तरुणांनी व्यापार व्यवसाय पुढे येण्याची गरज आहे. अशी अशा व्यक्त केली. यावेळी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी गावच्या विकासासाठी सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. गाव करील ते काय राव करीन परंतु बाबासाहेब दळवी यांनी चांगल्या प्रेरणेने गावासाठी चांगले काम करत आहे .अशी भावना यावेळी व्यक्त केली यावेळी थोरात कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले, शिवसेनेचे संपर्कप्रमुख बाजीराव दराडे ,उपजिल्हाप्रमुख महेश नवले ,अमृतसागर दूध संघाची संचालक आनंदराव वाकचौरे, आप्पासाहेब आवारी, विजय कमलाकर पोटे, उद्योजक तांबे ,रोडे, वर्पे ,गायत्री वर्पे ,अनिल नवले ,सरपंच दत्तात्रय डगळे, उपसरपंच शांताराम वाकचौरे, पोलीस पाटील संतोषभाऊ वाकचौरे ,देवराम वाकचौरे, शरद वाकचौरे ,तुकाराम गोरडे ,वसंत वाकचौरे , सुनील कुंदे ,रामदास डापसे ,राजेंद्र आव्हाड ,रेखा जगताप ,अनिल असावा, सरवार साहेब ,आप्पासाहेब वाळुंज, एल के पाटील आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी योगी केशवबाबा चौधरी, माजी खासदार सदाशिव लोखंडे ,अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर नवले, ज्येष्ठ शेतकरी नेते दशरथ सावंत ,अगस्ती साखर कारखाने संचालक पर्वत नाईकवाडी, माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी दळवी यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले प्रास्ताविक उद्योजक सतीश बोडके यांनी केले तर स्वागत संकेत दळवी यांनी केले सूत्रसंचालन निलेश पर्वत व हरिभाऊ फापाळे यांनी केले तर आभार माजी सभापती दादा पाटील वाकचौरे यांनी मानले. हा लोकार्पण सोहळा पार पाडण्यासाठी व सभामंडप बांधकामासाठी तसेच स्टेज उभारणीसाठी पोलीस पाटील संतोष वाकचौरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मत बाबासाहेब दळवी यांनी व्यक्त केले

