पुन्य वार्ता
कर्जुले हर्या/ प्रतिनिधि
पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथिल स्वयंभू भगवान श्री हरेश्वर महाराज उत्सवानिमीत्त भागवत पारायण व जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ३७५ वा वैकुंठ गमन सोहळा तसेच ७२ वा अखंड हरीनाम सप्ताहास दि.२ एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरी वृत्तपत्र समूहाचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी स्वयंभु हरेश्वर देवस्थानला सदिच्छा भेट दिली व श्री हरेश्वर महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी डॉ.आरोटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्वयंभु हरेश्वर महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. स्वयंभु हरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक श्री.शिवाजीराव शिर्के यांनी डॉ.विश्वासराव आरोटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
वै. तुकाराम महाराज शास्त्री व स्व. विष्णू शिंदे यांनी गावासह मंदिर परिसरासाठी भरीव योगदान दिले. ह.भ.प.डॉ. नारायण महाराज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाच्या कालावधीमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देवस्थान समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अखंड विणा, पहाटे ४ ते ६ काकडा, सकाळी ६ ते १० भागवत पारायण, स.१० ते १२ गाथा भजन, सायं ३:३० ते ५:३० संत चरित्र कथा जगदगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा अभंग निरुपण, दु.५:३० ते ६:३० हरिपाठ रात्री ७ ते ९ नामवंत किर्तनकारांचे हरिकीर्तन नंतर महाप्रसाद व हरीजागर असा दिनक्रम चालणार असून काल्याच्या कीर्तनाचे या सप्ताहाची सांगता होणार आहे..

राजस्थानातील मकराना या दगडाचा वापर करून हरेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराचा परिसर देखणा आणि निसर्गरम्य आहे. कौलारू बांधकाम असणारे जुने मंदिर आणि त्याचे सभागृह कालबाह्य झाल्याने गावकऱ्यांनी नवीन मंदिर जिर्णोद्धाराचे आणि सभागृह उभारण्याचे काम हाती घेतले व ते पूर्ण केले ही बाब कौतुकास्पद आहे. आपणही सामज्याचे काही देणे लागतो त्यामुळे मी या देवस्थानला महाशिवरात्री निमित्त होणाऱ्या महाप्रसादासाठी २ पोते साबुदाणा देत आहे –
डॉ. विश्वासराव आरोटे, संपादक, दैनिक समर्थ गावकरी

दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ.विश्वासराव आरोटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करताना स्वयंभु हरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष तथा दैनिक नगर सह्याद्रीचे संपादक श्री.शिवाजीराव शिर्के, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ. ( छाया: श्रीनिवास शिंदे)
