पुन्य वार्ता
संगमनेर: पोदार प्रेप, संगमनेर शाळेने गुरुवार,दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी ऑरेंज कॉर्नर येथील गणपती मंदिर लगत असलेल्या पार्क मध्ये ‘पपेट शो’ च्या माध्यमातून “चांगला स्पर्श, वाईट स्पर्श” या विषयावर लहान मुलांसाठी एक सामाजिक जागरूकता मोहीम राबविन्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजित कार्यक्रमाची रुपरेषा तसेच महत्व उपस्थित प्रेक्षकांना समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्देश समाजातील अल्पवयीन विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक समजावून सांगणे आणि त्यांना सुरक्षित, जागरूक आणि स्वावलंबी बनवणे हा होता.
पपेट शो प्रयोगाद्वारे विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श तसेच आत्मरक्षा यासंबंधी माहिती देण्यात आली व या विषयावर आधारित प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रात्यक्षिकाअंती
आत्मसात केलेल्या ज्ञानाची चाचणी म्हणून
मुलांनसोबत प्रश्नउत्तराचा कार्यक्रम घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक, पालक, पार्क मध्ये उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक, बाल प्रेक्षक व आवारातील इतर पालकवर्गानेही आपली लक्षणिय उपस्थिती दर्शविली.
प्रेक्षकांनी उत्कृष्ठ अभिप्राय नोंदवत समाजातील सद्यस्थिती बघता, काळाची गरज ओळखून ही मोहीम राबविल्या बद्दल शाळेचे आभार मानले.
पोदार प्रेपच्या मुख्याध्यापिका सौ. सोनल शुक्ला यांनी सांगितले की समाजाची सद्यस्थिती बघता बालकांची सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची बाब आहे.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक समजण्यासाठी मदत होईल तसेच स्वसुरक्षा कशी करावी हे ही मार्गदर्शन पालकांना व
विद्यार्थ्यांना मोलाचे ठरेल. पोदार इंटरनॅशनल स्कूल व पोदार प्रेप संगमनेर हे समाज हितासाठी कायमच बांधिल आहेत असेही त्यांनी सांगितले.
पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. मिनाक्षी मिश्रा यांच्या बहुमुल्य मार्गदर्शनाखाली पोदार प्रेप च्या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणपती मंदिर ट्रस्ट चे सदस्य श्री. रवींद्र जोशी यांनी मोलाचे योगदान दिले.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे प्रशासकिय अधिकारी श्री. सागर नेरपगार, पोदार प्रेप च्या सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.
सरतेशेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

