पुन्य वार्ता
अकोले(प्रतिनीधी)-लहान मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमालीचा वाढल्यामुळे त्यांचा मेंदू दिवसेंदिवस आकुंचित होत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.त्यामुळे त्यांच्या ठायी असलेली आकलन आणि भाषा शिक्षणाची मूलभूत क्षमता नष्ट होत आहे. इंटरनेटचे व्यसन जडलेल्या मुलांमध्ये आत्ममग्नता(व्हर्च्युअल ऑटिझमचे रुग्ण) वाढत आहेत. समाज म्हणून आगामी काळात याची जबर किंमत मोजायला लागणार आहे असा सावधगिरीचा इशारा समाज माध्यमांच्या अभ्यासक,पत्रकार मुक्ता चैतन्य यांनी दिला.
अकोले तालुका पत्रकार संघ व तालुक्यातील विविध पत्रकार संघटनांच्या वतीने पत्रकार दिनाच्या निमित्ताने अकोले पंचायत समिती सभागृह येथे डिजिटल मीडियाच्या अभ्यासक, पत्रकार मुक्ता चैतन्य यांचे “आजच्या डिजिटल मीडियातील आव्हाने”या विषयावर व्याख्यान पार पडले. यावेळी मुक्ता चैतन्य बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. किरण लहामटे हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी मुक्ता चैतन्य म्हणाल्या की -डिजिटल जगात तुम्ही पत्रकार असो की नसो, इतर कुठल्याही व्यवसायात असो, नुसते युजर असा सर्क्युलर रिपोर्टींगमध्ये अनेकांचा कळत नकळत सहभाग असतो. आणि त्यातून अनेक प्रश्न तयार होत आहेत. एखादी खोटी, अर्धसत्य माहिती सर्क्युलर रिपोर्टींगमुळे खरी असल्याचा आभास निर्माण होतो. त्या आभासी असत्याच्या आधारावर माणसं स्वतःची मतं बनवण्यापासून निरनिराळ्या प्रसंगात निर्णय घेण्यापर्यंत अनेक गोष्टी करत आहेत. माध्यमांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींनी तर यापासून दूर राहिलंच पाहिजे पण प्रत्येक युजरनेही आपण याचा कळत नकळत भाग होत नाही ना हे तपासणं गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले.
इंटरनेटचे जडलेले व्यसन, सुरक्षित नसलेला नागरिकांचा डेटा, वाढत चाललेले सायबर गुन्हे आणि विश्वासार्हता आणि अधिकृत स्त्रोत माहिती नसताना सोशल नेटवर्किंग साईट्समधून(सर्क्युलर जर्नालिझमच्या माध्यमातून) पसरवली जाणारी खोटी माहिती ही आजच्या डिजिटल काळातील मोठी आव्हाने आहेत. मोबाइलसारखी गॅझेट्स वापरणारे लोक केवळ तंत्रशिक्षित आहेत. डिजिटल काळात माध्यम शिक्षित समाजाची नितांत गरज आहे. दुर्दैवाने आपल्या समाजात माध्यम शिक्षण कमालीचे दुर्लक्षित आहे.त्याविषयी मांडणी करत असतानाच ‘सर्क्युलर रिपोर्टींग किंवा सर्क्युलर पत्रकारिता’ या अतिशय महत्वाच्या आणि दुर्लक्षित विषयाची त्यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली.
आमदार डॉ.किरण लहामटे यांनी समाजकारण, राजकारणातील वाईट प्रवृत्तींवर घाव घालण्याची ताकद पत्रकारितेत आहे, समाजा पुढील प्रश्न पत्रकारांनी ताकदीने उचलले पाहिजेत असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात पत्रकार संघाचे अध्यक्ष अमोल वैद्य यांनी तालुक्यातील पत्रकारितेच्या वाटचालीचा आढावा घेतला.
याप्रसंगी ज्येष्ठ नेते कॉ.कारभारी उगले, विजयराव वाकचौरे, इंजि.सुनिल दातीर,सुधाकरराव देशमुख,ॲड.के.बी. हांडे,डॉ.मनोज मोरे,विधीज्ञ ॲड .वसंतराव मनकर,बी.जे.देशमुख,प्राचार्य हेरंब कुलकर्णी,विनय सावंत,कैलासराव शेळके,संदीपराव शेटे, खंडू वाकचौरे,हभप दिपक महाराज देशमुख,बाळासाहेब भोर, डॉ.साहेबराव वैद्य, शिवाजी आरज, हेमंत दराडे,सचिन शेटे, अमोल देशमुख, संदीप शेणकर,सुभाष येवले,मच्छिंद्र मंडलिक,डॉ.बी. बाय.देशमुख,प्रा. चांगदेव डोंगरे,प्रा. विजय भगत,प्रा. किरण जाधव,डॉ.सुनील मोहटे,डॉ.द.के.गंधारे, प्राचार्य बादशहा ताजने,घनश्याम माने, डॉ.सुशील बेनके, डॉ.सय्यद, हेमंत मोरे,संजय हासे, पोपट फरगडे, प्रकाश हासे,दिपक राऊत,साहित्यिक राजेंद्र भाग्यवंत, भाऊसाहेब कासार, दिपक पाचपुते,विलास वाकचौरे, राजेंद्र भोर, के. के. डावरे,
पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, प्रकाश टाकळकर, विद्याचंद्र सातपुते, गणेश आवारी,अमोल पवार,नरेंद्र देशमुख, विलास तुपे, आबासाहेब मंडलिक,भाऊसाहेब वाकचौरे,हर्षदीप डावरे,राजू मालुंजकर,दिनेश जोरवर,अक्षय आभाळे, मुकुंद लहामटे,सचिन मंडलिक, हरीश कुसळकर, ,डॉ रमा कुलकर्णी,सौ. सुशीला बापट ,प्रा.डॉ. महेजबिन सय्यद, प्रतिमा कुलकर्णी, नीलिमा देशमुख,प्रा डॉ. रंजना कदम, मीनल चासकर, शीतल वैद्य, आशा आभाळे,स्नेहल राऊत,सौ.ललिता बेनके आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, उपस्थित होते.
प्रास्ताविक व स्वागत पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्रीनिवास रेणूकदास यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शिक्षणतज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी करून दिला.अध्यक्षीय सूचना प्रकाश महाले यांनी मांडली. त्यास नंदकुमार मंडलिक यांनी अनुमोदन दिले.सूत्रसंचालन पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश आरोटे व सचिव चंद्रशेखर हासे यांनी केले.आभार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले.


