पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- लोकनेते,माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वाढदिवसानिमित्त अकोले तालुका काँग्रेस, जयहिंद लोकचळवळ,सावरगाव पाट ग्रामस्थ व रोटरी क्लब अकोले यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र विकार चिकीत्सा व सवलतीच्या दरात मोतिबिंदु शस्त्रक्रिया शिबीर सावरगाव पाट येथे संपन्न झाले.
या शिबीरास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गरजु ९५ रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.
सावरगाव पाट येथील विविध कार्य सेवा सोसायटी सभागृहात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
त्याचबरोबर श्री सर्जुनाथ विद्यालय सावरगाव पाट ग्रंथालय विभागासाठी वेगवेगळ्या विषयांवरील 100 पुस्तके भेेट देण्यात आले. या प्रसंगी
संचालक,संगमनेर तालुका दूध उत्पादक सहकारी संघ , गाव तिथे वाचनालय या उपक्रमातून संगमनेर तालुका व परिसरात ३२ वाचणालयांची निर्मिती,जयहिंद वाचनायलय चळवळीचे माध्यमातून ग्रामीण भागात वाचन चळवळ वाढावी यासाठी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाबद्दल जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे श्री विलासराव कवडे यांनी व तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी नेहे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री तुकाराम कानवडे सर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून आभार मानले.
यावेळी आण्णासाहेब एखंडे, शरदराव नेहे, विनोद हांडे, विद्याचंद्र सातपुते सर यांच्या विशेष कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
हे दोनही उपक्रम यशस्वी करण्यासाठी बि वाय सहाणे, पंडित नेहे सर,नवनाथ नेहे रमेशराव पवार, उमेश नेहे सर, अमोल सहाणे, निलेश सहाणे,कैलासराव जाधव, रामकिसन नेहे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष शिवाजी नेहे ,विलासराव कवडे, पोपटराव नाईकवाडी, बाळासाहेब शेटे सर, संपतराव कानवडे, आण्णासाहेब एखंडे,विनोद हांडे, चंद्रमोहन निरगुडे, रमेशराव बोडके,रोटरी क्लब अकोले सेंट्रल अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते सर,अगस्ती साखर कामगार संघाचे अध्यक्ष शरदराव नेहे, जिजाबा कानवडे, माणिकराव अस्वले,सुदाम नेहे, , रामनाथ सहाणे, पाटीलबा नेहे, रामनाथ खोकले, देवराम कुमकर,प्रकाश बोडके, दिपक पवार, शाहु नेहे, गौरव जोशी यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

