पुण्य वार्ता
प्रतिनिधी
पिंपरीः वार्तांकनासाठी गेलेले न्यूज 18 लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर नारायणगाव (ता.जुन्रर,जि.पुणे)येथे काल (ता.२)भरदिवसा हल्ला करण्यात आला.त्यांच्या मोटारीचीही नासधूस केली गेली. या घटनेचा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार संघाने लगेच तीव्र निषेध केला.तसेच याप्रकरणी पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गु्न्हा दाखल करण्याची लेखी मागणी संघाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अतुल परदेशी यांनी स्थानिक नारायणगाव पोलिस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षकांना भेटून आज (ता.३) केली.अन्यथा पत्रकारांच्या वतीने मोठे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा दिला.
बांधकाम कामगार नोंदणीसाठी अनधिकृतरित्या नारायणगाव येथे भरविण्यात आलेल्या बायोमेट्रिक कॅम्प ची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या तोडकर यांच्याावर ही नोंदणी करणाऱ्या खासगी एजंटांनी काल दुपारी हल्ला केला.अरेरावी करीत त्यांना धक्काबुक्की केली. त्यांच्या मोटारीची काचही फोडली.याबाबत नारायणगाव पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली.परंतू,पोलिसांनी एफआयआऱ घेतला नाही.आपल्या गैर कामाचे पितळ उघडे पडू नये याकरिता संघटनेच्या काही लोकांनी हा हल्ला प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या तोडकरांना रोखण्यासाठी केल्याचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रदेशाध्यक्ष डॉ.परदेशी यांनी सांगितले.तसेच हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा नोंदवून घेण्याऐवजी तोडकरांविरुद्धच महिलांना धक्काबुक्की केली आणि खंडणीचा गुन्हा दाखल करण्याच्या सुरु असलेल्या हालचालीबद्दल हा प्रकार म्हणजे उल्टा चोर कोतवाल को डांटे असा आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.त्याामुळे तोडकर यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे राज्य संघटक संजय भोकरे सरचिटणीस विश्वास आरोटे राज्यातील सर्वच पत्रकार बांधव पत्रकार सचिन तोडकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असेही परदेशी यांनी निवेदन देताना आपल्या मनोगत सांगितले.
यासंदर्भात सबंधित हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा,अशी मागणी त्यांनी केली आहे.
