पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- अकोले तालुक्याचे भूमिपुत्र माणिकराव डावरे आणि दीपक तारगे यांच्या कुरुळी, पुणे येथील प्रोफाईव्ह इंजिनिअरिंग कंपनी ला दि बेस्ट इंटरप्रिनियर स्टार अवॉर्ड- 2025 ने सन्मानित करण्यात आले.
नुकताच पुणे येथे सिपीआर ऑडिटीरियम मध्ये हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. एस एम ई चेंबर ऑफ इंडिया आणि अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रा .लि. पुणे, तसेच असोसिएशन ऑफ व्हॅल्यूएशन प्रोफेशनल आणि सहसंवाद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा हा सन्मान पुरस्कार
विविध क्षेत्रातील भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यातील बेस्ट इंटरप्रिनियर स्टार अवॉर्ड 2025 हा पुरस्कार प्रोफाईव्ह इंजिनीरिंग प्रा.ली,चाकण, पुणे चे डायरेक्टर माणिकराव डावरे आणि दिपक तारगे यांना मिळाला. सदर पुरस्कार हा महाराष्ट्र इंडस्ट्री असोसिएशन आणि एस एम इ चेम्बर्स ऑफ इंडिया चे संस्थापक तथा चेअरमन चंद्रशेखर साळुंखे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी चितळे बंधू मिठाईवाले चे पार्टनर केदार चितळे व महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाऊन शिप लिमिटेड चे मॅनेंजिंग डायरेक्टर पी.डी. मलिकनेर, अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.चे डायरेक्टर तथा स्टार इंटरपरिनियर अवॉर्ड च्या फाऊंडर स्मिता शशांक भोलाने,
अर्थार्थ वेल्थ मॅनेजमेंट प्रा.लि.चेनीरज भोलाने,किरण भोलाने, शशांक भोलाने,सहसंवाद फौंडेशनच्या फाऊंडर केतकी महाजन- बोरकर,सिंगापूर चे भिडे साहेब,प्रसिद्ध उद्योजक रामदास माने हे उपस्थित होते.
सदर पुरस्कार माणिकराव डावरे आणि दीपक तारगे यांनी स्वीकारला.या पुरस्कार वितरण प्रसंगी
प्रोफाईव्ह कंपनीचे अजित डावरे, किरण थोरात, पंकज कुंभारे, तुषार वाडेकर, आमलेश पाटील हे उपस्थित होते.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल माणिकराव डावरे,दीपक तारगे व प्रोफाईव्ह कंपनीच्या सर्व टीम चे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

