पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड )-
केवळ ८ मार्च हा एक दिवस नाही,तर प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस आणि प्रत्येक दिवसाचा प्रत्येक क्षण महिलांच्या हक्काचा,अफाट कर्तृत्वाचा,सन्मानाचा,आनंदाचा दिवस असला पाहीजे.स्त्री ही एक वास्तव्य,मातृत्व,पावित्र्य आणि कर्तत्व आहे.असे विचार अकोले नगरपंचायतीच्या माजी नगरअध्यक्षा यांनी प्रतिपादीत केले.
तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतीक महीला दिना निमित्त हळदी कुंकु कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी सोनालीताई नाईकवाडी या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.
या प्रसंगी मंदा सदगीर,पुष्पा शिंदे,सिताबाई जाधव,वनिता पथवे,यमुना पथवे,यमुना मेंगाळ,सुनिता गावंडे, उज्वला पंडीत,स्वाती घुले, सुनिता कासार,अश्विनी घुले,अनिता शिंदे,सुनिता आभाळे, सुवर्णा धात्रक यांसह प्राचार्य सुनिल धुमाळ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
सोनाली नाईकवाडी यांनी पुढे मार्गदर्शन करताना महीला सक्षम आहेतच.त्यांच्यावरील अन्याय, अत्याचार थांबवा. मुलीच्या जन्माचे स्वागत करा.मुलीला शिकवा.मोबाईल पासून दुर रहा.स्त्री विकासाकडे लक्ष केंद्रीत करा. प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीच्या माणुसपणाची जाण आणि स्वतःच्या माणुसपणाने भान ठेवून स्त्रीयांशी सन्मानाने वागावे.याच महिला दिनाच्या शुभेच्छा असल्याचे विचार व्यक्त केले.
स्वाती घुले यांनी मुलींमध्ये संकटांना दोन हात करण्याची ताकद निर्माण व्हावी यासाठी प्रशिक्षण घ्या. आईकडून जन्मदान,प्राणदान,रक्तदान,हस्तीदान,लज्जादान मिळते त्या आईचा सन्मान करा असे विचार प्रतिपादीत केले.
आश्विनी घुले यांनी स्वतःचे संरक्षण स्वतः करा. मुली सुरक्षित नाहीत. त्यासाठी स्वतः सक्षम बना असे विचार व्यक्त करून माहिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा.सुवर्णा धात्रक यांनी केले.
सुत्रसंचलन रामदास कासार यांनी केले.तर अण्णासाहेब ढगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
[ एखादया समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रीयांच्या प्रगतीच्या अवस्थेवरून ठरते.त्यामुळे कुटूंबात,समाजात स्त्रीचे मानाचे स्थान वाढत आहे. स्त्री शक्ती,प्रेरणा,संस्कार आहे.तिच्या कष्टाने कुटुंब घडते,तिच्या कर्तृत्वाने समाज उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करतो._ प्राचार्य सुनिल धुमाळ ]

