पुण्य वार्ता
अकोले(ज्ञानेश्वर खुळे)--
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित भाई शहा, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वप्नातील अग्रेसर महाराष्ट्र घडविण्यासाठी अकोले तालुक्यातील भाजपा एकदिलाने महायुतीचे उमेदवार आमदार डॉ.किरण लहामटे यांचे पाठीशी खंबीर उभी असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केले.अगस्ती मंदीरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीसाठी अकोले तालुक्यातील सर्व विभागातील भाजपाचे निवडक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलताना जालिंदर वाकचौरे म्हणाले,येणा-या विधानसभेत भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला 180 पेक्षा अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे.वरिष्ठांचा आदेश शिरसावंद्य म्हणून अकोले तालुक्यातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार डॉ.किरण लहामटे यांचे प्रचार कार्यात सर्वात पुढे असेल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मिळत असलेल्या सहकार्याने अकोले तालुका विकासात्मक वाटचालीवर आहे.आ.डॉ.किरण लहामटे यांनी जवळपास 2 हजार 500 कोटींचा निधी आणल्याने पायाभूत सुविधांची मोठी कामे या तालुक्यात झाली.काही कामे प्रगतीपथावर असून प्रतिक्षेत असणा-या कामांचीही मोठी जंत्री आहे.शेती,आरोग्य,शिक्षण,बेरोजगारी,पाणी,सिंचन या प्रश्नांच्या कायमस्वरुपी सोडवूणीकीसाठी महाराष्ट्रात महायुती आणि अकोल्यात महायुतीचे डॉ.किरण लहामटे ही गरज असल्याने आम्ही सर्व भाजपाचे कार्यकर्ते मन लावून महायुतीचा प्रचार करणार असल्याचा निर्धारही यावेळी जालिंदर वाकचौरे यांनी व्यक्त केला.
या बैठकीस तालुक्यातील भाजपाचे पंचायत समिती सभापती दत्ता देशमुख भाऊसाहेब वाकचौरे सुनिल उगले नरेंद्र नवले अमोल कोटकर गणेश पोखरकर दिलीप कोटकर संजय लोखंडे सौ रेश्मा गोडसे सौ अंजली सोमणी सौ लक्ष्मीताई शिंदे अमोल घुले साहेबराव दातखिळे कैलास तळेकर मदन आंबरे साहेबराव आरोटे राजु लहामगे सिद्धेश आरोटे ज्ञानेश पुंडे सुशांत वाकचौरे राहुल चव्हाण परशराम काकड ज्ञानेश्वर बोडके मच्छिन्द्र पानसरे कारभारी बंदावणे रामदास पांडे प्रणेश शिंगोटे मच्छिन्द्र चौधरी प्रदीप नवले मच्छिन्द्र गोडसे प्रविम सहाणे गोरक्ष उकिर्डे वाल्मिक देशमुख रामनाथ टेमगिरे संदीप अस्वले पोपट शिंदे श्रेयस जोशी सोनु खर्डे निलेश वाकचौरे आकाश बिन्नर सोमनाथ उघडे चंद्रकांत वाकचौरे राहुल चव्हाण विकास शिंदे उत्कर्ष जोशी यांचे सहित अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.