पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- श्रमिक महाविद्यालय संगमनेर च्या विज्ञान शाखेत अकोले तालुक्यातील पाडाळणे येथील प्राजक्त बाळासाहेब सावंत हा ८९.८३% गुण मिळवून टॉपर मध्ये उत्तीर्ण झाला आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगला नाही तर प्राजक्त सावंत सारखे विद्यार्थी संगमनेर तालुक्यातही यशस्वी होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा भाजप कोतुळ मंडल चे अध्यक्ष बाळासाहेब गणपत सावंत यांचा चिरंजीव प्राजक्त याने ८९.८३% गुण संपादन केले आहे.त्याच्या या यशाबद्दल माजी आमदार वैभवराव पिचड,अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, जनरल मॅनेजर दादाभाऊ सावंत ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी व संचालक आदीसह अनेक मान्यवरांनी व मित्रमंडळाने प्राजक्त सावंत याचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्राजक्त सावंत याने पुढे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्याचे ध्येय ठरविले आहे.

