पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनीधी)-
तीव्र उन्हाळ्याच्या या दिवसात निळवंडे धरणाचे कालवे दुथडी भरून वाहत आहेत.नदी काठापासून डोगरापर्यंतचा सर्व परिसर हिरवागार दिसत आहे.माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचे अकोले तालुक्यात सर्वत्र पाणी देण्याचे स्वप्न प्रवरा खोऱ्यात पूर्णत्वास गेले याचा आनंद एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चित आहे असे प्रतिपादन अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख यांनी केले.
आज सुगाव बुदृक शिवरातून जाणाऱ्या निळवंडे कालव्याची पहाणी त्यांनी पत्रकारां समवेत केली. तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
निळवंडे उजव्या कालव्याला प्रथम पाणी सुटले तेव्हा त्याची पहानी माजी मंत्री , जलनायक स्व.पिचड साहेबांनी याच पुलाजवळ उभे राहून केली होती अशी आठवणही त्यांनी सांगितली
निळवंडे धरणाला चार कालवे काढून त्यामधून कालव्या खालील आणि वरच्या भागाला पाणी मिळावे हे स्वप्न माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी पाहिले होते.भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी प्रथमच पाणी मिळाले आहे. निळवंडे कालव्यामुळे गावांना जोडणारे रस्ते झाले.गावांमधील अंतरही कमी झाले आहे,शेतकऱ्यांना शेतमालाच्या वाहतुकीसाठी कालव्या लगतच्या या रस्त्यांचा उपयोग होत आहे. काही ठिकाणी कालव्यां वर छोटे छोटे पूल तयार झाले आहेत, होणार आहेत.त्या मुळे त्या परिसरातील वाडीवस्त्यावर जाणे येणे सुकर होणार आहे असे ते म्हणाले.
माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी कालव्यांच्या बाबतीत अतिशय विचार पूर्वक व दूरदृष्टी ठेवून निर्णय घेतले त्याचा लाभ येथील माणसांना होत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, सार्व मत चे उपसंपादक अमोल वैद्य , माजी प्राचार्य व रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते आदी त्यांचे समवेत उपस्थित होते.
पुन्य वार्ता

