पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):-
क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय अहिल्यानगर,संलग्न अकोले तालुका क्रीडा समितीच्या अध्यक्षपदी प्रा.योगेश उगले यांची तर सचिवपदी दत्ता जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अकोले तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व क्रीडा शिक्षकांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
अगस्ती महाविद्यालय अकोले येथे के.बी.दादा सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी अहिल्यानगर जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे,अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर,अकोले पंचायत समिती चे गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत,प्राचार्य भास्कर शेळके,माध्यमिक शिक्षक बँकेचे संचालक सुधीर कानवडे,संचालक किशोर धुमाळ,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सोनवणे आदी जण उपस्थित होते.अकोले तालुका क्रीडा संघाच्या उपाध्यक्षपदी अनिल चासकर,दत्तात्रय घुले,कार्याध्यक्षपदी शांताराम साबळे,खजिनदार रावसाहेब शेळके,सहसचिव प्रकाश सुर्वे व विकास साबळे,तज्ञ मार्गदर्शक सुधीर कानवडे,सुनील वाळुंज,गणपत धुमाळ,शशिकांत कातोरे,महिला प्रतिनिधी धनश्री गायकवाड,जिल्हा प्रतिनिधी मच्छीन्द्र देशमुख व अनिकेत जाधव,प्रसिद्धी प्रमुख सौरभ पोखरकर,सदस्य म्हणून दिलीप झोळेकर ,भागवत देशमुख,विनोद तारू, राधाकीसन घुले व आदिनाथ आभाळे आदींची कार्यकारणीत सर्वानुमते निवड करण्यात आली.नवीन पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे ,गटशिक्षण अधिकारी अरविंद कुमावत व एटीएस चे अध्यक्ष सुनील दातीर यांनी उपस्थित क्रीडा शिक्षकांना मार्गदर्शन केले.तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या खेळाडूंचा,सेवा निवृत्त झालेल्या क्रीडा शिक्षकांचा व विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या क्रीडा शिक्षकांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

