पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी):-
कोणतीही गोष्ट मिळविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे असतात.मनात जिद्द असेल तर हालाकीच्या परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते.जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही असे मत गडचिरोली येथे पी एस आय पदावर नियुक्त झालेले आकाश नेहे यांनी व्यक्त केले.
सावरगांव पाट (ता.अकोले) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत निवड झालेल्या यशस्वी भूमिपुत्रांच्या सत्कार समारंभ आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.याप्रसंगी गावचे सरपंच रामनाथ गावंडे,उपसरपंच बाळासाहेब गावंडे,सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पथवे,माजी व्हा.चेअरमन पोपट पवार,व्हा.चेअरमन पंडित नेहे,छत्रपती दूध संस्थेचे चेअरमन कैलासराव जाधव,सर्जुनाथ विद्यालयाचे मुख्यध्यपक तुकाराम कानवडे,दत्ता जाधव,पी एस आय हृषीकेश सहाणे,ह.भ.प.निवृत्ती नेहे,माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके,प्रतिष्ठित व्यापारी श्रीकांत सहाणे, माधव काळूजी सहाणे,गोरक्ष नेहे,ज्ञानदेव सहाणे,सोमनाथ पवार,अमोल सहाणे,संजय सहाणे,सोमनाथ सहाणे,शिवाजी सहाणे,मेजर दिनकर सहाणे,सोसायटी संचालक जालिंदर सहाणे,शरद झालटे,विक्रम झालटे,संदीप नेहे,बाजीराव सहाणे,योगेश नेहे,रामकृष्ण नेहे,सोसायटीचे सचिव प्रमोद नेहे,विष्णू दराडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना पी एस आय आकाश नेहे म्हणाले की,मी एका सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलो.परिस्थिती तशी हालाकीचीच होती,गर्दनी येथे विनाअनुदानित विद्यालयात वडिल विनापगारी काम करत होते.आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जाऊन आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती.हे सर्व सुरू असताना आमचे शिक्षणही सुरू होते.आर्थिक परिस्थितीवर मात करत मिळालेले यश हे निश्चितच आनंद देऊन जाते हे प्रत्यक्षात अनुभवले.माझ्या यशाचे सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना,शिक्षकांना व माझ्या मित्रपरिवाराला देतो.पी एस आय आकाश नेहे यांचे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण झाले.गडचिरोली येथे त्यांना प्रथम नियुक्ती देण्यात आली.
या वेळी पी एस आय पदी निवड झालेले हृषीकेश सहाणे हे आपल्या भाषणात म्हणाले की,संघर्षाशिवाय यश नाही.इतर क्षेत्रातही आपण उत्तम करियर करू शकतो.सावरगांव पाट चे डी वाय एस पी राहुल झालटे यांचा गावच्या वतीने सत्कार समारंभ केला तेव्हा मी त्या कार्यक्रमात होतो,तेव्हा पासूनच मनात आपणही एखाद्या उच्चपदावर पोहचायचे ठरवून प्रयत्न सुरू केले.अनेकवेळा प्रयत्न करूनही यश पदरात पडत नव्हते पण प्रत्यन सोडले नाही.प्रयत्न प्रामाणिक करत राहिलो आणि यशाला गवसणी घालता आले.या यशामध्ये माझ्या वडिलांचा फार मोठा वाटा आहे.असे ते म्हणाले.
या प्रसंगी मंत्रालयीन सहाय्यक पदी श्रीकांत गौराम जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे वडील गौराम वाळीबा जाधव यांच्या सन्मान करण्यात आला.जलसंपदा विभागात समिक्षा पंडित नेहे,पुरवठा विभागात प्रेरणा बाळासाहेब सहाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.गावचे उपसरपंच बाळासाहेब सहाणे,कैलासराव जाधव,पोपट पवार,मुख्याध्यापक तुकाराम कानवडे आदींनी मनोगत व्यक्त केले.सत्कार समारंभाचे नियोजन ग्रामपंचायत सावरगांव पाट,आदिवासी विविध कार्यकारी सेवा सोसायटी सावरगाव पाट,छत्रपती दूध संस्था सावरगांव पाट व गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल सहाणे यांनी केले तर आभार दत्ता जाधव यांनी मानले.कार्यक्रमास सर्जुनाथ विद्यालयाचे विद्यार्थी व गांवकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
