पुन्य वार्ता
माळवाडी, (बोटा) (ता. संगमनेर) : निसर्गरम्य वातावरणात वसलेले, अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या सेवेत आहे. कंप्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स या कालानुरूप व रोजगारक्षम शाखांमुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आपल्या परिसरातच उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
कॉलेजच्या केवळ दुसऱ्याच वर्षात औद्योगिक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांशी करार करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ट्रेनिंग, इन-प्लांट ट्रेनिंग, गेस्ट लेक्चर्स तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज लॅबोरेटरीज, अद्ययावत कॅम्पस व अनुभवी प्राध्यापक वर्ग ही या महाविद्यालयाची वैशिष्ट्ये आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सुलभ करण्याचा संकल्प
ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य पालकांच्या मुलांना दर्जेदार व आधुनिक शिक्षण त्यांच्या हद्दीतच सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने श्री बाळेश्वर शैक्षणिक व कृषी विकास फाउंडेशन स्थापन करण्यात आले. या फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव पोखरकर यांच्या दूरदृष्टीतून ही संस्था उभारली गेली असून, कमी कालावधीतच नावारूपाला आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरण आणि विद्यापीठाची मान्यता
न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 च्या मार्गदर्शनाखाली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या मान्यतेने विविध अभ्यासक्रम राबविले जात आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे महाविद्यालय भविष्यातील करिअर संधींचे नवे दालन ठरणार आहे.
अध्यक्ष डॉ. पोखरकर म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शिक्षणाची दारे खुली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कमी शुल्कात उच्च दर्जाचे शिक्षण देणे हे आमचे ध्येय आहे.”
विद्यार्थ्यांनी DTE कोड 5509 अंतर्गत कॅप प्रक्रियेत सहभाग नोंदवून प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी, तसेच नॉन कॅप फेरीसाठी सुद्धा अर्ज करावेत, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव आरोटे यांनी केले आहे.

