पुन्य वार्ता
संगमनेर खुर्द :(संजय गोपाळे )
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने संगमनेर तालुक्यातील पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्ताने किराणामाल व मिठाईचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या संकल्पनेतून व राज्याचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील पत्रकारांना दिवाळीनिमित्त किराणामाल व इतर साहित्याचे वाटप प्रदेश सरचिटणीस डॉ.विश्वासराव आरोटे, व जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या हस्ते किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी सर्व सभासदांना दिपवाळी निमित्त… ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी किराणा साहित्य व मिठाईचे वाटप संघटनेच्या वतीने करण्यात येते.
महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना किराणा साहित्य व मिठाईचे वाटप करून पत्रकारांची दिवाळी गोड करण्यात आली. याप्रसंगी पत्रकारांना मार्गदर्शन करताना डॉ.आरोटे यांनी येणाऱ्या कालखंडामधील पत्रकाराचे आव्हान लक्षात घेता तालुक्यातील लोकप्रतिनिधींना पत्रकारांच्या समस्यांसाठी व मागण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो पक्ष पत्रकारांची बाजू विधानसभेत मांडेल, व पत्रकारांच्या प्रश्नासाठी बाजू लावून धरतील त्यांच्याच बाजूने या पुढील काळात पत्रकार उभे राहतील असे पत्र स्थानिक लोकप्रतिनिधींना द्यावे, पत्रकार हा देखील मताचा गठ्ठा असून सरकारने कान नाक, डोळे उघडे ठेवून पत्रकारांच्या कुटुंबियांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असे आव्हान डॉ. आरोटे यांनी केले .
या प्रसंगी संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करत संघटना वर्षभर पत्रकारांच्या हित जोपासण्यासाठी सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असून राज्यातील एकमेव पत्रकारांची हित सोपासणारी राज्य संघटना देशातील एकमेव संघटना असल्याचेसांगितले.संघटनेचे अहिल्यानगर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करत सर्व पत्रकारांनी एकोप्याने राहून संघटना मोठी करण्यास सहकार्य करावे असे आव्हान केले. या प्रसंगी तालुकाध्यक्ष संजय गोपाळे, उपाध्यक्ष स्वानंद चत्तर, अमोल मतकर, ज्येष्ठ पत्रकार गोरक्षनाथ मदने, सदस्य संजय अहिरे, बाळासाहेब गडाख, भारत पडवळ, संजय साबळे,संदीप थोरात,भारत रेघाटे,, आनंदा जोंधळे, सुखदेव गाडेकर,गोरक्ष नेहे, सचिन जंत्रे,नितीन कोकणे, दत्ता घोलप,रमजान शेख, वैभव ताजने,नामदेव बागडे,अजित गुंजाळ, नवनाथ गाडेकर,सुभाष भालेराव, विकास वाव्हळ, व सतीश आहेर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार,सी न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे संचालक बाळासाहेब गडाख यांनी केले.

