पुण्य वार्ता
गणोरे – प्रतिनिधी
पिंपळगाव निपाणी येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत गणोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांघिक स्पर्धेत कबड्डी लहान गट (मुले) प्रथम क्रमांक, खो खो लहान गट (मुली)प्रथम क्रमांक, खो खो लहान गट (मुले) प्रथम क्रमांक पटकावून यांची तालुकास्तरावर निवड झाली आहे. सांस्कृतिक स्पर्धेच्या यशा नंतर आता क्रीडा स्पर्धेतही गणोरे- जिल्हा परिषद शाळेचाच डंका.
अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व अकोले पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणोरे केंद्राच्या केंद्रस्तर क्रीडा स्पर्धा पिंपळगाव निपाणी येथे नुकत्याच पार पडल्या
या स्पर्धेत गणोरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्पर्धांमध्ये लांब उडी लहान गटात मुलीमध्ये आरोही संजय भालेराव हिने प्रथम क्रमांक पटकावून तिची तालुकास्तरासाठी निवड झाली आहे. लहान गट मुलामध्ये धावणे स्पर्धेत निहाल कुमार पटेल हा द्वितीय आला. कु.आरोही संजय भालेराव द्वितीय, उंच उडी लहान गट कु. आराध्या भाऊसाहेब आंबरे द्वितीय तर सांघिक स्पर्धेत कबड्डी लहान गट मुलीं मध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.
गटशिक्षणाधिकारी अभय कुमार वाव्हळ, विस्तार अधिकारी अनिल गायकवाड, केंद्रप्रमुख सुनील घुले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक अशोक नेहरकर बाबासाहेब गवांदे, भगवंत साबळे तात्यासाहेब मंडलिक, अरुणा दातीर अस्मिता डमाळे, अश्विनी झिरमिटे आदीचे मार्गदर्शन लाभले.


