पुण्य वार्ता
अकोले ( प्रतिनिधी ) :-
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अगस्ती इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट,कॉम्पुटरअँप्लिकेशन अँड रिसर्चच्या एमसीए विभागातील विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत संस्थेचा ध्वज उंच फडकावत ठेवला आहे. नुकतीच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा निकालात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले असून या परीक्षेत एमसीए विभागातील द्वितीय वर्षामध्ये सावंत सुप्रिया गोविंद हिने 81.36 % मिळून प्रथम तर हासे पूजा सुरेश हिने 74.79 % मिळून दुसरा तर भोर शुभांगी नवनाथ हिने 73.36 % मिळून तिसरा क्रमांक मिळविला आहे.
संस्था व महाविद्यालय तसेच सर्व प्राध्यापक हे यशस्वी विद्यार्थी घडवण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाविद्यालय नेहमी आघाडीवर असते आणि त्याचेच हे फलित आहे, असे गौरवोद्गार काढत यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्यकारी विश्वस्त माजी मंत्री श्री मधुकरराव पिचड साहेब तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय सुनीलजी दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख तसेच सर्व विश्वस्त व कार्यकारणी सदस्य तसेच इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. प्रशांत तांबे, एमबीएचे विभाग प्रमुख प्रा. गोपाल बुब, एमसीएचे विभाग प्रमुख प्रा. अमोल नवले, परीक्षा विभाग प्रमुख प्रा. सुयोग गजे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

