पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी-
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या आजही,भविष्यातही समाजाला दिशादर्शक आहेत.त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल असे प्रतिपादन अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरणजी लहामटे यांनी केले. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि ॲड. एम. एन. देशमुख महाविद्यालय राजूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्भय कन्या अभियान शिबिराच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. तसेच सावित्रीचा वारसा सावित्रीच्या लेकींनीच चालवावयास हवा.मुलींच्या शिक्षणाची क्रांती ही सावित्रीबाईमुळेच झाली. असे या कार्यक्रमाच्या अध्यक्षा अकोले तालुका पंचायत समिती प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. निर्भय कन्या अभियान शिबिर धामणवन या आदिवासी गावात आयोजन केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मिंढे सर यांनी विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षनही दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. गीते व्ही. एन. यांनी केले.यावेळी डॉ.काकडे एल.बी.यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आढावा घेतला. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. कासार आर.एन. यांनी केले या शिबिरासाठी प्राजक्ता डायमंड हायस्कूलच्या महाविद्यालयीन विद्यार्थी, राजुर पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल रूपाली राहटाळ यांनी सामाजिक सुरक्षा व महिला सुरक्षा कायदे यावर मार्गदर्शन केले.या वेळी ॲड.एम. एन.देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य बी.बाय देशमुख, मुख्याध्यापक सचिन वाकचौरे,डॉ.डी. बी. तांबे यांसह विदयार्थी उपस्थित होते.

