पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
- अकोले तालुक्यातील अबीतखिंड (भोजनेवाडी) येथील आदर्शमाता कै बुधाबाई नामदेव भोजने यांचा तृतीय स्मृतिदिन व माजी मंत्री मधुकरराव पिचड यांची सामुदायीक अभिवादन सभा अकोले तालुक्यातील अबीतखिंड (भोजनेवाडी) येथे पार पडली
या निमित्ताने राष्ट्रीय प्रवचनकार ह भ प शोभाताई तांबे यांचा प्रवचन कार्यक्रम तसेच अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली मुंबई विभाग व सह्याद्री सेवा संघ मुंबई यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समजसेवक,पत्रकार, व सावित्रीच्या लेकीचा सन्मान करण्यात आला
सदर प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ह.भ.प.सौ.शोभाताई तांबे (ओतूर), प्रा. सौ.मंजुषा शांताराम काळे ,श्री. नंदू गंगाधर राऊत, पत्रकार सुनील गीते , पत्रकार सुनील आरोटे ,रामचंद्र भोजने, गोविंद साबळे. यांना पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवराम मुढे यांचा हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सी.बी.भांगरे , राजूर चे मा. सरपंच गणपतराव देशमुख ,इंजि, भास्कर यलमामे ,स्वामी समर्थ संस्थेचे संस्थापक शांताराम काळे, राजेंद्र मैड. ह.भ.प.पानसरे महाराज,डॉ.रामनाथ मुठे, डॉ.सुरेखा मुठे , वीज वितरण चे श्री भोईर , सुनील सोनार, मुरलीधर गोडे, एकनाथ गोडे ,सेवा निवृत्त पोलीस अधिकारी,, डी.एम. भांडकोळी व दत्तात्रय पोरे , विजय लोहकरे लक्ष्मण भोजने, तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर जगधने रामनाथ भोजने, संगीता भोजने, अभिषेक भोजने ,एईश्वर्या भोजने, मुकीदा भोजणे , धोंडिबा भोजने , श्रीमती विठाबाई भोजने, पूजा भोजने, आदी सह अबीतखिंड , व भोजनेवाडी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते
रामनाथ भोजने यांनी स्वागत करून आभार मानले
सदर प्रसंगी माजी मंत्री लोकनेते जलनायक स्व. मधुकरराव पिचड यांचे स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

