पुन्य वार्ता
पाडाळणे (ता. अकोले) – महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक गांवकरीचे मुख्य संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या वतीने पाडाळणे येथील आदिवासी कॉलनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांसाठी मोठी मदत ठरणार असल्याचे मत सहशिक्षक नितीन कोते यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कपडे, वह्या, दप्तर व खाऊ वाटप करण्यात आले. मुलांच्या आनंदी चेहऱ्यांनी शाळेचा परिसर दिवाळी साजरी केल्यासारखा उजळून निघाला. यावेळी ज्येष्ठ नेते शिवाजीराव नाईकवाडी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका उपाध्यक्ष अशोक शेळके तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत उत्तम संस्कार मिळाले, तर भविष्यात समाजासाठी आदर्श अधिकारी घडतील.”
कार्यक्रमाचे स्वागत सहशिक्षक नितीन कोते यांनी केले, तर शिक्षिका मंगल शेळके यांनी आभार मानले. विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला.

