पुण्यवार्ता
प्रतिनिधी (श्री दत्तू जाधव ):-अकोले तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या अंबड ग्रामपंचायत सरपंच पदी कविता भोर यांची एकमताने निवड करण्यात आली
मावळत्या सरपंच सुरेखा हासे यांनी नुकताच आपल्या सरपंचपदाचा राजीनामा गटविकास अधिकारी यांना दिला होता तो मंजूर देखील झाला त्यामुळे गावचे सरपंच पद रिक्त झाले होते यामुळे एका जागेसाठी आज ग्रामपंचायत कार्यालय येथे निवड प्रक्रिया पार पडली सरपंच पदासाठी बायसाबाई सोमनाथ जाधव व कविता संदीप भोर यांनी अर्ज दाखल केले परंतु ऐनवेळी बायासाबाई जाधव यांनी निवडणूकीतून माघार घेतली त्यामुळे कवीता भोर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्यामुळे त्यांच्या नावाची सुचना संदिप जाधव यांनी मांडली त्यास सुरेखा हासे यांनी अनुमोदन दिले लगेच निवडणूक अधिकारी यांनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून अमोल आंबरे तलाठी बागडे यांनी तर सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ए के शेलार यांनी काम पाहिले या निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते सदर निवडीचे जेष्ठ नेते गिरजाजी जाधव डॉ जालिंदर भोर नामदेव जाधव माधवराव भोर रोहिदास जाधव दत्तू जाधव भास्कर भोर मधुकर भोर बाळचंद भोर दिनकर जाधव मच्छिंद्र जाधव दामू गिर्हे भानूदास भोर केशव मालुंजकर कैलास कानवडे शिवाजी जाधव विलास भोर राहूल भोर शांताराम भोर विकास जाधव सत्यम भोर एकनाथ गिर्है मिलिंद नाईकवाडी नवनाथ भोर सतिश भोर सचिन भोर वैभव जाधव यांनी अभिनंदन केले आहे

