पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने आज भाजप कार्यालयात तालुक्यातील विविध गावातील 122 बांधकाम कामगारांना आज संसारउपयोगी भांडे वाटप भाजप अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, तालुका सरचिटणीस राहुल देशमुख, सचिन जोशी,अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चक्रधर सदगीर,नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे,उप नगराध्यक्ष शरद नवले, नगरसेवक विजय पवार, नगरसेविका जनाबाई मोहिते, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रतीक वाकचौरे, कार्यालय प्रमुख कविराज भांगरे,भाजप कामगार मोर्चाचे संयोजक गोरख उकिरडे,गोविंद लांडे,किरण गायकवाड,नवनाथ मोहिते,वाल्मिक नवले,प्रणित गायकर,सुशांत शिंगवन आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या माध्यमातून 13500 कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला.कामगारांचे फॉर्म भरून घेण्यासाठी भाजप कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.
