पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द (संजय गोपाळे )
संगमनेर तालुक्यातील निमज येथील द्राक्ष उत्पादक प्रगतशील शेतकरी व युथ फाउंडेशनचे संचालक संतोष रामनाथ डोंगरे यांना भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आय सी ए आर )
राष्ट्रीय किट संसाधन ब्युरो, बंगलोर (एन बी ए आय आर) या संस्थेमार्फत दिला जाणारा उत्कृष्ठ शेतकरी पुरस्कार डॉ. अशोक दलवाई आय ए एस फार्मरची एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर (Former Chief नॅशनल रॉयनफिड एरिया अथोरिटी गव्हर्मेंट ऑफ इंडिया नवी दिल्ली यांचे शुभहस्ते आय सी ए आर – एन बी ए आय आर बंगलोर येथे प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ.मेजर सिंग , डॉ.अर्चना सिन्हा , डॉ.एस.एन. सुशील डॉ. ज्ञानेश्वर वाघचौरे यांच्या उपस्थित व मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्रातील आदर्श शेतकरी द्राक्ष बागायतदार संतोष रामनाथ डोंगरे यांना प्रदान करण्यात आला.

