पुण्य वार्ता
अकोले,ता.२३:साहेब आम्ही महायुती सोबत कसे राहायचे तुम्हीच सांगा आम्हाला पिचड साहेब हाच पक्ष तेच चिन्ह त्यांनी आम्हाला जीव लावला शेतीला पाणी ,हाताला काम दिले त्यांना कसे विसरायचे ते आज अडचणीत असताना आम्ही त्यांच्याकडे कशी पाठ फिरवायची हे नैतिकतेला धरून नाही .त्यात आदिवासी समाज भाजपाला स्वीकारायला तयार नाही .पिचड यांच्यामुळे आम्ही भाजपात आलो .भाजप पक्ष वाडी वस्तीत पोहचवला याचा किमान विचार होणे भाजपकडून अपेक्षित होते .मात्र भाजप मोहिते,कोल्हे, यांचा विचार करतो मात्र पिचड यांना ८४ वर्षाचे असतानाही त्यांचेकडे डोळे झाक करत असेल तर वैभव पिचड यांनी अपक्ष उभे राहावे आम्ही त्यांना निवडून आणण्याची शपथ घेतली असून तुम्ही आमचा निरोप आदरणीय मोदी,शहा,फडणवीस,बावनकुळे यांचे पर्यंत पोहचवा असा सल्ला आमदार कैन्हयालाल किशोरे, यांना उपस्थितांनी दिला .यावेळी फेटा बांधून व हातात चांगला निरोप पाठवा यासाठी पेढा देऊन आमदारांचा सन्मान देखील केला .
यावेळी आदिवासी सेवक काशिनाथ साबळे,आदिवासी सेवक श्रावण हिले,सुरेश भांगरे,चंद्रकांत भांगरे,रामनाथ भांगरे,पांडुरंग भांगरे,मोहन पोटकुळे, भाऊराव भांगरे,सयाजी अस्वले,गंगाराम धिंदळे,रामजी काठे,अध्यक्ष सीताराम भांगरे,निलेश किशोरे, गोविंदभाई ठाकुर,दशशिशभाई दिवाकर,माजी सरपंच सोमनाथ वाळेकर माजी.सरंपच गणपत भांगरे,सा.पांडुरंग भांगरे,संतोष बनसोडे,गोकूळ कान काटे,सुरेश गाभाले,अनंत घाणे,तुकाराम खाडे आदी १००कार्यकर्ते उपस्थित होते .
बुधवारी गुजराथ येथील दोहा मतदार संघाचे विधमान आमदार कैन्हयालाल किशोरे, व त्यांच्या सोबत ५सदस्यांची टिम अकोले तालुक्यात आली होती ,त्यांनी मुख्य गावे असल्याले १०गावांना भेट देऊन कार्यकर्त्यांची बाजू समजून घेतली त्यांच्यासमवेत जेष्ठ भाजप नेते सीताराम भांगरे उपस्थित होते ,
प्रसंगी बोलताना
मा.आमदार कैन्हयालाल किशोरे, म्हणाले अकोले विधानसभा मतदार संघात येण्याची माझी दुसरी वेळ असून मी माजी मंत्री पिचड यांना नाशिक येथे भेटून आलो आहे .माजी आमदार यांना देखील भेटून परिस्थितीचा आढावा घेतला असून सर्वसामान्य कार्यकर्ता थोडा दुखावला असून त्यांची माफक अपेक्षा मी समजू शकतो मात्र निर्णय घेण्याचा अधिकार वरिष्टाना असून त्यांच्यापर्यंत मीतुमचा निरोप पोचवतो याबाबत निःशंक राहा तुम्ही मला आदर दिला त्याबद्दल मी आपला ऋणी आहे ,प्रास्तविक काशिनाथ साबळे तर आभार चंद्रकांत भांगरे यानी मानले .तर बिरोबा मंदिरात पिचड साहेब लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना देखील केली.
