पुण्य वार्ता
संगमनेर खुर्द :
संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निमगाव खुर्द येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत धनराज कैलास गोपाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
माजी महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालीयांच्या. मार्गदर्शना खाली विविध विकास कामे करण्यासाठी
दि. 07/02/2025 शुक्रवार रोजी सकाळी निमगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दुपारी 2 वाजता सर्व सभासदांच्या उपस्थिती निवडणूक प्रक्रिया पार पडली.
माजी सरपंच संदीप गोपाळे यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. म्हणून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून धनराज कैलास गोपाळे यांनी सरपंच पदासाठी आपला अर्ज दाखल केला…. परंतु बाकीचे 8 सदस्यांपैकी कोणीही अर्ज न आल्यामुळे धनराज गोपाळे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
या प्रसंगी याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य संदीप गोपाळे (माजी सरपंच ) बाळासाहेब गोपाळे, राहुल चंद्रमोरे (उपसरपंच ) ज्योत्स्ना गोपाळे, कावेरी भागवत, रूपाली कासार, पल्लवी गोपाळे, अस्मिता कासार इत्यादी सदस्य उपस्थित होते. तसेच कामगार पोलीस पाटील गोरक्षनाथ गोपाळे, मनीष गोपाळे, शेतकी संघाचे संचालक भास्कर गोपाळे,सतीश कासार, प्रविण गोपाळे, विनायक गोपाळे, पी. के. गोपाळे , भास्कर गोपाळे,विलास गोपाळे, सोसायटीचे व्हा.चेअरमन संपत गोपाळे.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धांदरफळच्या मंडल अधिकारी ज्योती ससे, मदतनीस सहाय्यक ग्रामविकास अधिकारी प्रशांत हासे, ग्राम विकास अधिकारी संजय हासे यांनी काम पाहिले.
आभार बाळासाहेब गोपाळे यांनी मानले.
