पुन्य् वार्ता
अकोलेः( प्रतिनिधी) आंतरभारती रूरल इंटरनॅशनल मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट, वीरगाव संचलित, आनंदगड तंत्रनिकेतन महाविद्यालयास ( पॉलिटेक्निक कॉलेज) नुकतीच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (AICTE) कडून सिविल , मेकॅनिकल , कम्प्युटर , इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजेंस व मशीन लर्निंग या पाच कोर्सेस साठी मंजूरी मिळालेली असून, शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई (DTE ०५६६२) व महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली असून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने संलग्नता प्रदान केली आहे. सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रियेसाठी सुरु झालेली आहे. सदर डिप्लोमा 3 वर्षांचा असून प्रथम वर्षात दहावी उत्तीर्ण विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी ही सुवर्णसंधी असेल. संकुलातील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज व वसतिगृह ,मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात डी. फार्मसी आणि बी. फार्मसी हे दोन्ही कोर्स तसेच अक्युपंक्चर डिप्लोमा या सर्व कोर्सेस चे प्रवेश सुरु आहेत हि माहिती मातोश्री राधा कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्या डॉ पल्लवी फलके प्राचार्य किरण चौधरी, विभागप्रमुख विद्याचंद्र सातपुते, सीमा दिघे, रवींद्र आंबरे यांनी दिली.ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेवून प्रवेश घ्यावेत असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव डॉ अनिल रहाणे ,सुप्रिया वाकचौरे आणि गीता रहाणे , शिवराज वाकचौरे, अक्षय रहाणे यांनी केले आहे.


