पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)-
अकोले तालुक्यातील आदिवासी डोंगराळ भाग म्हणून ओळख असलेले पिंपळगाव नाकविंदा येथील अगस्ती रुरल एज्युकेशन संस्थेचे महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाने मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा टप्पा दुसरा या अभियानांतर्गत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर,पंचायत समिती यांचे मार्फत तालुकास्तरीय मुल्यांकन करण्यात आले.या विदयालयात एकूण ३७७ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.या मुल्यांकन समिती द्वारा वर्गखोल्या,ग्रंथालय,प्रयोगशाळा, मुख्याध्यापक कार्यालय,कर्मचारी कक्ष,आरोग्य सेवा,स्वच्छता,गांडूळ खत प्रकल्प,फर्निचर,वृक्ष संवर्धन, क्रीडांगण व सुविधा,डिलीटल प्रोजेक्टर,आय.सी.टी.लॅब,शैक्षणिक साधनसामुग्री,बोलक्या भिंती,परसबाग,युडायस प्रणाली,महावाचन चळवळ,दप्तर मुक्त अभियान,सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजीक उपक्रम,शिष्यवृत्ती,बौद्धीक कौशल्य विकास,परिपाठ यांसारखे उपक्रम, असणाऱ्या पायाभूत सुविधा यामध्ये १५० पैकी या विदयालयास १३६ गुण प्राप्त झाले असून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळाल्याने तीन लाख रुपयाचे बक्षीस जाहीर झाले असल्याची माहीती विदयालयाचे प्राचार्य सुनिल धुमाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
विदयालयाने मागील वर्षी देखील पहिल्या टप्यात दुसरा क्रमांक मिळविला होता.विदयालय नेहमीच अनेक उपक्रमांमध्ये अग्रेसर असून याही वर्षी गुणवत्तेचा उच्चांक गाठत नेत्रदिपक यश संपादन केले आहे.या यशाबद्दल तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे,गटशिक्षण अधिकारी अभयकुमार वाव्हळ,विस्तारअधिकारी सविता कचरे,केंद्रप्रमुख देवेंद्र आंबेटकर,संस्थेचे अध्यक्ष अॅड.वसंतराव मनकर,सचिव मंगेश नवले,सरपंच लक्ष्मण सोंगाळ,उपसरपंच मारूती काळे,माजी सरपंच विजय गायकवाड,बबनराव आभाळे,सर्व सदस्य,पोलीस पाटील चंद्रकांत लगड, मारूती आभाळे,भाऊसाहेब कासार, विनोद हांडे, सर्व ग्रामस्थ आदींनी विदयालयाचे प्राचार्य सुनिल धुमाळ तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदींचे अभिनंदन केले आहे.

