पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
दिनांक 9 जून 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देवठाण अंतर्गत अढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय देवठाण येथे हिवताप प्रतिरोध दिनानिमित्त हिवताप व डेंग्यू इत्यादी संभाव्य जलजन्य आजारांविषयी विद्यार्थ्यांना जनजागृती आरोग्य शिक्षण देण्यात आले. पावसाळा सुरू असल्याने साठलेल्या पाण्यात एडिस इजिप्त डासांची निर्मिती होऊन जीवघेण्या डेंगूचा प्रसार होतो.त्यामुळे घरामध्ये व घराभोवती घाण पाणी साठवू देऊ नका, कुलर मधील पाणी साचल्याने त्यात डेंगूच्या आळ्या निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणून ते वारंवार बदला, आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळा, गप्पी मासे पाळा व हिवताप टाळा, आजाराची लक्षणे आढळल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ताबडतोब रक्त तपासणी करावी असे आवाहन शाळेतील विद्यार्थ्यांना व पालकांना आरोग्य सेवक श्री. जगदिश पाटील यांनी केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे मार्गदर्शक डॉ. संभाजी नागरे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक सय्यद साहेब, विद्यालयाचे प्राचार्य श्री.सहाणे सर, प्रा. वलवे सर, प्रा. मोरे मॅडम, फड सर, कदम सर उपस्थित होते व त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


