पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अनुषंगाने अकोले तालुक्यात नामनिर्देशन पत्र वाटपाची/ भरण्याची प्रक्रिया सुरु असून आज दिनांक २३/१०/२०२४ रोजी अकोले तालुक्यात एकूण 5 नामनिर्देशन पत्र देण्यात आले असून त्यापैकी 3 अपक्ष उमेदवार आहेत. तसेच श्री. पांडुरंग नानासाहेब पथवे यांनी आज नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांचेकडे दाखल केले, यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सिद्धार्थ मोरे उपस्थित होते. दिनांक २२/१०/२०२४ रोजी श्री. पांडुरंग नानासाहेब पथवे, श्री. भिवा रामा घाणे, श्री. अमित अशोक भांगरे, श्रीमती जाईबाई सिताराम ठोकळ, श्री. मारुती देवराम मेंगाळ, श्री. गंगाराम सोमा लेंडे, श्री. दीपक यशवंत पथवे, श्री. विलास हौशीराम आगिवले व दिनांक २३/१०/२०२४ रोजी श्री. किरण यमाजी लहामटे, श्री. तुषार रमेश दराडे, श्री. जयराम गोविंदा इदे, श्री. शिवराम दौलत हिले, श्री. सतीश नामदेव भांगरे यांनी नामनिर्देशन पत्र खरेदी केले आहेत. नामनिर्देशन पत्र वाटपाची/ भरण्याची प्रक्रिया दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत सकाळी ११ ते दुपारी 3 या वेळेत सुरु असणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनुपसिंह यादव यांनी यावेळी दिली.


