पुन्य वार्ता
शिर्डी (प्रतिनिधी)~रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबविले गेल्यास रोटरीची जनमानसातील प्रतिमा अधिक उंचावेल तसेच आपली सेवा, उत्साह आणि परस्पर सहकार्य या गोष्टींमुळेच रोटरीची ध्येये यशस्वी होतील असा विश्वास रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे असिस्टंट गव्हर्नर रो.अमोल वैद्य यांनी व्यक्त केला.
रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबाचे नूतन अध्यक्ष रो.महेंद्र कोते व सचिव रो.हितेश थावानी व संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा नुकताच उत्साही वातावरणात संपन्न झाला. यावेळी असिस्टंट गव्हर्नर रो.अमोल वैद्य बोलत होते.याप्रसंगी सहा. प्रांतपाल रो. रविकिरण डाके,माजी सहा. प्रांतपाल रो. राजेंद्र कोते,रो. अभय दुनाखे, डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. माजिदभाई पठाण, रोटरी क्लब अकोले सेंट्रलचे माजी अध्यक्ष व डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो.विद्याचंद्र सातपुते, शिर्डी क्लबचे संस्थापक सदस्य रो.डॉ. पी. जी गुंजाळ,रो. डॉ.एम. वाय . देशमुख, रो. अरविंद निसाळ,रो. दत्तात्रय गोंदकर,रो. डॉ. संतोष मैड,रो. डॉ. ओंकार जोशी,रो. सतिश वैजापूरकर,रो.अमोल टिळेकर, रो यशोदीप शेटे,आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना रो. वैद्य म्हणाले की,माजी अध्यक्ष रो.निलेश गंगवाल यांच्या 2024-25 या वर्षात क्लबने अनेक महत्वाचे प्रकल्प यशस्वीपणे राबवले, ज्यामुळे या क्लबने प्रतिष्ठा निर्माण करता एक नवी उंची गाठली आहे. तीच परंपरा यापुढील काळात नूतन पदाधिकारी पुढे घेऊन जाण्यासाठी आणखी प्रयत्न करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.समाजातील विविध घटकांना रोटरी मध्ये जोडणे, महिला सदस्यांची संख्या वाढवणे, तरुणांच्या सहभागावर भर देणे, देश विदेशातून रोटरीच्या संपर्कातून शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची दर्शनासाठी सोय करण्यासाठी स्थायी सुविधा उभारणे या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. त्यामुळे जगभरातून येणाऱ्या रोटरी सदस्यांशी संपर्क प्रस्थापित करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.त्यासाठी सीएसआर इंडिया ग्रँट, ग्लोबल ग्रँट यांच्या माध्यमातून मोठे आणि स्थायी प्रकल्प उभे राहतील यासाठी प्रयत्न करावेत. तसेच रोटरीच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, 23-24 ऑगस्टला चेन्नई येथे होणाऱ्या Aim25 सेमिनारमध्ये सहभागी होणे, तसेच पुढील वर्षी होणाऱ्या Tai Pai, Taiwan इंटरनॅशनल कन्व्हेंशन आणि गोव्यातील डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये जास्तीत जास्त सदस्यांनी सहभागी व्हावे असे आवाहनही रो. वैद्य यांनी व्यक्त केले.यावेळी गव्हर्नर रो. सुधिर लातूरे यांच्या प्रेरणादायी शुभ संदेशाचेही रो. वैद्य यांचेकडून वाचन करण्यात आले.
नूतन अध्यक्ष रो. महेंद्र कोते, सेक्रेटरी रो.हितेश थवाणी यांनी 25/26 मध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांची माहिती दिली.
मावळते अध्यक्ष रो. निलेश गंगवाल यांनी गतवर्षी राबविलेल्या विविध सामाजिक व विधायक उपक्रमांचा आढावा घेतला.
याप्रसंगी सहा. प्रांतपाल रो. रविकिरण डाके यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन रो. यशोदीप शेटे यांनी केले तर आभार सचिव रो. हितेश थावाणी यांनी मानले.


