पुण्य वार्ता प्रतिनिधी:-अकोले तालुक्यातील अंबड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय लक्षवेध प्रज्ञाशोध परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे
यामध्ये इयत्ता दुसरीचे नऊ विद्यार्थी लक्षवेध परीक्षेत पात्र झाले असून विशेष श्रेणीत चार विद्यार्थ्यी उतीर्ण झाले आठ विद्यार्थ्यांनी जिल्हा व राज्य यादीत स्थान पटकावले आहे इयत्ता तिसरीचे तेरा विद्यार्थी पात्र झाले असून चार विद्यार्थ्यांनी 200 च्या पुढे गुण मिळवले इयत्ता चौथीचे सहा विद्यार्थी पात्र व मिशन आरंभ मध्ये इयत्ता चौथीचे 12 विद्यार्थी पात्र झाले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे शालेय व्यवस्थापन समिती अंबड ग्रामपंचायत अंबिका माध्यमिक विद्यालय अंबड व पालक वर्गातून गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे तसेच गटशिक्षणाधिकारी माननीय कुमावत साहेब शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख मान्य नरसाळे साहेब यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे विद्यार्थ्यांच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले सदर विद्यार्थ्यांचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव उपाध्यक्ष नवनाथ जाधव सर्व सदस्य माता पालक ग्रामस्थ गावच्या सरपंच सुरेखाताई असे उपसरपंच प्रमोद भोर सोसायटीचे चेअरमन परीक्षेत भोर व्हाईस चेअरमन कैलासराव कानवडे तसेच जेष्ठ मार्गदर्शक गिरजाजी जाधव साहेब पत्रकार दत्तू जाधव शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे सर भरत तोरमल संतोष सदगीर श्रीमती वायाळ मॅडम यांनी अभिनंदन केले
