पुन्य वार्ता
मुंबई : हिंदुस्थानातील थोर दानशूर समाज कल्याण न्यास प्रतिष्ठानचे संस्थापक तथा स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळ ठाकरे यांचे कट्टर भक्त तथा उभाठा गटाचे ठाणे लोकसभा संपर्कप्रमुख धर्म सेवक डॉक्टर सोन्या काशिनाथ पाटील यांना यावर्षीचा थोर समाज भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.. समाजातील विविध घटकांमध्ये अपार कष्ट व समर्पणाने कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्याचा एक आगळा-वेगळा उपक्रम म्हणून दरवर्षी साजरा होणारा “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार सोहळा” यंदाही मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉईंट, मुंबई येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती आयोजकांनी दिली आहे
हा पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या योगदानाची दखल घेत दिला जातो. कोरोना महामारीमुळे 2020 आणि 2021 या दोन वर्षांचे पुरस्कार वितरण स्थगित करण्यात आले होते. परंतु त्या दोन्ही वर्षांचे पुरस्कार महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल महामहीम भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन, मुंबई येथे यशस्वीरित्या प्रदान करण्यात आले.
यंदा 2024 च्या पुरस्कार वितरणासाठी तेलंगणाचे राज्यपाल माननीय महामहीम जिष्णु देव वर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले असून, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज व महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन पुण्यश्लोक अहिल्यादेवी धर्मपीठ यांच्या वतीने करण्यात येत असून, डॉ. सोन्या काशिनाथ पाटील समाज कल्याण न्यास, महाराष्ट्र राज्य या संस्थेचा या कार्यक्रमात सक्रिय सहभाग व सहकार्य लाभले आहे. सामाजिक क्षेत्रात विशेष योगदान दिल्याबद्दल या संस्थेला “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार 2024” ने गौरवण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे उद्दिष्ट समाजातील निस्वार्थ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि प्रेरणादायी कार्याची समाजासमोर उजळणी करणे हे आहे. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर, समाजसेवक, प्रशासकीय अधिकारी व जनतेचा सहभाग अपेक्षित आहे.

हा कार्यक्रम हा केवळ सन्मानाचा नव्हे तर समाजाच्या उन्नतीचा मार्गदर्शक ठरणारा महत्त्वाचा सोहळा असून, आयोजकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. तर धर्म सेवक सोन्या पाटील यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उभा टाकायचे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे खासदार संजय राऊत शिवसेनेचे नेते भास्करराव जाधव आमदार सुनील प्रभू माजी आमदार रुपेश म्हात्रे. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉक्टर किशोर पाटील त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
