पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनीधी)- जुन्या पिढीतील शिक्षक व
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोले येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक कारभारी किसनराव शेटे गुरुजी (वय ८४, रा.शेटे मळा,अकोले) यांचे गुरुवारी रात्री ९ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,दोन मुली,सहा भाऊ, एक बहिण,सूना, भावजय, पुतणे, पुतण्या,नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी अमरधाम अकोले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.वसंत,रामनाथ, शाम, अकोले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व बुवासाहेब नवले पतसंस्थेचे माजी उपाध्यक्ष संदिपराव शेटे, राजेंद्र , संजय शेटे, पुष्पा बबन मालुंजकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.तर रवींद्र , इंजि.सतिश शेटे, सौ.विद्या दशरथ कासार, शारदा गोर्डे यांचे ते वडील होत.प्रा.संदेश व सुदेश कासार, संकेत गोर्डे, अकोले नगर पंचायतीचे माजी नगरसेवक व रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष सचिन शेटे, औरंगपूर ग्रामपंचायतचे उपसरपंच संदेश वाळुंज,सागर,संगम , राहुल, रोहित, देवदत्त शेटे यांचे ते चुलते होत.
मानसी, धनश्री,संपदा, संस्कृती,सार्थक यांचे आजोबा होते.
कारभारी शेटे गुरुजी यांनी रुंभोडी, हिवरगाव आंबरे व अकोले येथे शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून सेवा झाली.त्यांचा मोठा जनसंपर्क होता. मनमिळावू व धार्मिक स्वभाव असणाऱ्या शेटे गुरुजी यांच्या निधनाबद्दल सर्वत्र दुःख व्यक्त केले जात आहे.
