पुण्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
डोंगरगाव (ता.अकोले, जि.अहिल्यानगर) येथे दिनांक २२ मे २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजता “शेतकरी मेळावा व जागर सभे” चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या मेळावा व सभेचे आयोजन समस्त शेतकरी बंधव डोंगरगाव पंचक्रोशी यांच्यातर्फे करण्यात आले असून, कर्जमाफी व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, मागण्या व उपाययोजना यावर खुला संवाद साधण्यात येणार आहे. या सभेस लोकप्रिय शेतकरी नेते, माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
मा.श्री. बच्चु कडू साहेब प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सदरील सभा – हनुमान मंदिर, डोंगरगाव, ता-अकोले, जि. अहिल्यानगर येथे गुरुवार, २२ मे २०२५ रोजी सायं. ६:०० वा. होणार असून सभेसाठी येणाऱ्या जनतेनी खाली दिलेल्या पदाधिकारी यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क – ८५०७१७७१७७ / ९७६६११००५२
सर्व शेतकरी बांधवांनी या जागर सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


