पुन्य वार्ता
संगमनेर (प्रतिनिधी)–सजीव सृष्टीच्या रक्षणाकरता थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी दंडकारण्य अभियान सुरू केले असून 19 व्या दंडकारण्य अभियानाचा शुभारंभ शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वा. मालदाड येथील कानिफनाथ मंदिर डोंगर येथे महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख सौ दुर्गाताई तांबे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि मा आ.डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली 2006 पासून अमृत उद्योग समूह व विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण संवर्धनाचे दंडकारण्य अभियान राबवले जात आहे. दरवर्षी लाखो वृक्षांचे रोपण होत असून अनेक बोडके डोंगर आता हिरवीगार दिसू लागली आहेत याचबरोबर तालुक्यामध्ये वृक्ष संवर्धन संस्कृती वाढली आहे घरांच्या आसपास महिलांनी परसबागासह वृक्षांचे रोपण केले आहे.

या अभियानाची राज्य व राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली असून तालुक्यातील सर्व नागरिकांचा सहभाग असल्याने ही मोठी लोक चळवळ ठरली आहे. दंडकारण्य अभियानाचा यावर्षीचा शुभारंभ शनिवार 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता मायंबा डोंगर तसेच कानिफनाथ मंदिर मालदाड येथे होणार असून यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, डॉ.जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शंकरराव खेमनर, इंद्रजीत भाऊ थोरात ,पांडुरंग पाटील घुले, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे , बाबा ओहोळ,हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, अजय फटांगरे ,सोमेश्वर दिवटे,राजेंद्र कडलक, प्रा. बाबा खरात, विश्वासराव मुर्तडक, सरपंच गोरख नवले, सौ अर्चना बालोडे, निखिल पापडेजा, गौरव डोंगरे, जावेद शेख, हैदर अली यांच्यासह मालदाड व पंचक्रोशीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमासाठी मालदाड सोनोशी, घुलेवाडी, सायखिंडी, सुकेवाडी, वेल्हाळे, निमोन, परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन दंडकारण्य अभियान समिती व ग्रामपंचायत मालदड आणि मालदाड ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे

