पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- दहावी नंतर विद्यार्थ्यांना करियर करण्यास अनेक क्षेत्रात वाव असून कोणत्याही करियर क्षेत्रास विद्यार्थ्यांनी व पालकांनी कमी लेखू नये,जे ही क्षेत्र निवडाल त्यात सर्वोत्तम रहा असे प्रतिपादन रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेहेंदुरी येथे 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित सदिच्छा समारंभ व वार्षिक पारितोषिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी मॉडर्न हायस्कुल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सचे माजी प्राचार्य संतोष कचरे होते. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे,
शिक्षक गणपत आभाळे, अशोक नवले, मधुकर शेटे, साधना सोनवणे, सुनिता गुंजाळ, मनाली आंबरे, निलम रंधे,ॠतुजा मालुंजकर,शरद हांडे, पंढरीनाथ आरोटे,संजय वाकचौरे, बेबी आरोटे आदीसह विद्यार्थी-विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व प्रथम संस्थेचे कार्यकारी विश्वस्त तथा माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रा.सातपुते पुढे म्हणाले की,विद्यार्थांनीआपले आवडीच्या क्षेत्रातील ध्येय निश्चित करून त्यात करियर करावे. दुसऱ्याने करियर क्षेत्र निवडले म्हणून आपणही तेच निवडू नये, कोणत्याही क्षेत्राला कमी लेखू नका,जे ही करियर क्षेत्र निवडाल त्यात आपण सर्वोत्तम राहून आपले नाव कमवा, म्हणजे आपल्या नावाबरोबर आपल्या आई वडिलांचे, शाळेचे ,शिक्षकांचे नाव निघेल.आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवा.परीक्षेला सामोरे जाताना आत्मविश्वासाने व न घाबरता व अभ्यास करून जावे.कॉपी सारखे प्रकार कोणीही करू नये. दरवर्षी गेट टू गेदर चा कार्यक्रम करून सर्वांनी एकत्र येत रहावे असे सांगून या वर्षी सायकलींची मदत केली,पुढील वर्षी शाळेसाठी मोठी मदत करू असे आश्वसित करून सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना प्राचार्य संतोष कचरे म्हणाले की,विद्यार्थ्यांसाठी शिक्षक घेत असलेले परिश्रम वाखाखण्याजोगे असून मुख्याध्यापक सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सुंदर शाळा पहायला मिळाली.शाळा हे संस्काराचे केंद्र आहे, विद्यार्थी हे आई वडिलांचे व शाळेचे संस्कार कधीच विसरू शकत नाही .
विद्यार्थांनी व्यावसायीक व कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे.
व्यवसाय कोणताही असो त्यास दैवत मानून व्यवसाय करावा असे सांगून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त करताना आठवणीना उजाळा दिला.

शिक्षिका सुनीता गुंजाळ व अशोक नवले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक एम. एस. शेटे व एस .जी. हांडे हे जिल्हास्तरीय पंच परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल व कु .धनश्री प्रशांत आरोटे- आदर्श विद्यार्थीनी,कु.दामिनी संजय आरोटे- आदर्श खेळाडू तर कु.शर्वरी संजय आहेर हिस कलारत्न पुरस्कार देऊन त्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयातील स्मारकासाठी पाच हजार एक रु.देणगी स्वरूपात दिले.
स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र सोनवणे यांनी केले .वार्षिक अहवाल एम एस शेटे यांनी सादर केला. सूत्रसंचालन धनश्री प्रशांत आरोटे या विद्यार्थ्यांनींनी केले.तर आभार शिक्षक गणपत आभाळे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

