पुण्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी): वीरगाव येथील धर्मवीर आनंद दिघे इंग्लिश मिडिअम स्कूल व ज्युनिअर कॉलेज चा १२ वी चा विद्यार्थी वेदांत प्रमोद जगधने याने जेईई मेन परीक्षेत ९६.५५ गुण मिळवत जिल्ह्यात अव्वल स्थान मिळविले आहे.
उच्च शिक्षण विभागाच्या वतीने राष्ट्रीय परीक्षा एजन्सी मार्फत जानेवारी २०२५ मधे घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत ( JEE) वेदांत जगधने याने
भौतिकशास्त्र विषयात ९७.०१, रसायनशास्त्र विषयात ९२.०७ तर गणित विषयात ९५.६५ असे मिळून एकूण ९६.५५ गुण मिळविले आहेत. बी ई./ बी. टेक अभ्यासक्रमासाठी हि मुख्य परीक्षा असून पहिल्याच प्रयत्नात वेदांत ने हे यश मिळविले आहे.
वेदांत हा स्कूल च्या संस्थापक प्राचार्या संगिता उगले -जगधने व शिक्षण तज्ञ प्रमोद जगधने यांचा मुलगा आहे.या विद्यालयाचे आशिष पावबाके याने ८९.५० , साई देशमुख याने ८८.५१ तर सिद्धेश खतोडे याने ८३ गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, सचिव अनिल रहाणे, संचालिका सुप्रिया वाकचौरे, गीता रहाणे प्राचार्य किरण चौधरी, प्रा. संदीप थोरात, रविंद्र आंबरे , शिवराज वाकचौरे, दिलीप जगधने,अविनाश जगधने, दमयंती भोर आदींनी अभिनंदन केले आहे.
