पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- तालुक्यातील ढोकरी येथे सोमवार दि. २१ रोजी सायंकाळी ६ 5वाजता विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवजयंती उत्सव आणि संत पूजन सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थ व संत रविमामा भक्त परिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
या निमित्ताने सायंकाळी भव्य मिरवणूक संत पूजन व त्यानंतर ह भ प माऊली महाराज वाबळे यांचे हरिकीर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य दिव्य कार्यक्रम प्रसंगी तालुक्यातील तमाम नागरिक बंधू-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन समस्त
ढोकरी ग्रामस्थांच्या वतीने व प.पू.संत
रवीमामा भक्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
