पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिकानगर लहीत खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये गरीब व आदिवासी विद्यार्थ्यांची गरज ओळखून इंडिया डेव्हलपमेंट फाऊंडेशन मुंबई या संस्थेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कीट यामध्ये दप्तर,वही,पेन, पेन्सिल व इतर साहित्य चे मोफत साहित्य वाटप केले यासाठी विशेष प्रयत्न लहीत खुर्द येथील ग्रामस्थ इंजि श्री अविनाश शिंदे साहेब, लहीत खुर्द केंद्र चे केंद्रप्रमुख बर्डे साहेब,सरपंच सौ.सुरेखा ताई गोडसे , उपसरपंच श्री भारत गोडसे, डॉ श्री किशोर गोडसे तसेच शाळा संस्थापक श्री अंकुशराव गोडसे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री योगेश गोडसे, सदस्य श्री प्रविण मिढे , श्री योगेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी नवीन शैक्षणिक साहित्य मिळण्याचा विद्यार्थीच्या आनंद चेहरा वर ओसंडून वाहत होता. दरवर्षी असे साहित्य विद्यार्थ्यांना मिळावे अशी अपेक्षा विद्यार्थी आणि ग्रामस्थ मधून व्यक्त करण्यात आला.यावेळी आलेल्या पाहुण्यांचा यशोचित आभार शाळेचे कर्तव्यदक्ष , हरहुन्नरी, अनुभवी मुख्याध्यापक श्री विलास शिंदे सर यांनी मांडले आणि कार्यक्रम यशस्वी केला.



