पुण्य वार्ता
लिंगदेव (प्रतिनिधी ) :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे महाराष्ट्र राज्यात नव्याने चालू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .अकोले तालुक्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्या कडून गावागावतकॅम्प घेत हि योजना घराघरात कशी पोहचेल यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहे .त्याचाच एक भाग म्हणून लिंगदेव या ठिकाणी या योजनेचा शुभारंभ आमदार डॉ किरण लहामटे यांच्या सुविद्य पत्नी पूषा लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोले तालुका महिला अध्यक्ष निताताई आवारी यांच्या प्रमुख उपस्थित व लिंगदेव ग्रामपंचायत सदस्या कल्पना फापाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार डॉ किरण लहामटे यांचे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करत कॅम्प आयोजित केला गेला होता.यावेळी गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .
मुख्यमंत्री माझी बहिण लाडकी योजना कॅम्पचा पहिला दिवस मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गावातील १४७ महिला भगिनीने आपले कागद पत्र सादर करत आपला फॉर्म जमा केला .हा कॅम्प आयोजित करण्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस कार्याध्यक्ष हरिभाऊ फापाळे ,सदाशिव कानवडे ,भाऊसाहेब हाडवळे ,उत्तम हाडवळे ,बाळासाहेब कानवडे ,बूथ प्रमुख शैलेश कानवडे ,राधाकिसन फापाळे ,भाऊ कानवडे ,जानकीराम हाडवळे ,तुकाराम कोरडे ,बाबुराव कोरडे ,कुलदीप घोमल ,सुदाम हांडे ,भाऊसाहेब पवार ,बाळासाहेब पवार ,सुदाम फापाळे ,स्वाती कोरडे ,रेखा घोमल ,सुनिता हाडवळे व ग्रामस्त यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


