विरगाव(ज्ञानेश्वर खुळे)--
65 वर्षांवरील नागरिकांचे उतारवयीन आयुष्य निरोगी,सुखकर आणि वेदनारहित जावे म्हणून महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा अकोले तालुक्यातील विरगावात 272 नागरिकांनी लाभ घेतला.
ज्येष्ठ नागरिकांना सुखकर आयुष्यासाठी शासनाकडून या योजने अंतर्गत आरोग्य उपयोगी साहित्य किंवा उपकरण खरेदीसाठी 3 हजार रुपयांपर्यंत खर्च केला जाणार आहे.त्यादृष्टीने वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने देवठाण प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातर्फे नुकतेच वीरगावच्या ग्रामपंचायत कार्यालयात शिबीर संपन्न झाले.
या शिबीरात उपस्थित राहून 272 नागरिकांनी लाभ घेतला.वैद्यकीय अधिकारी डॉ.संभाजी नांगरे आणि डॉ.आदिती देशमुख यांनी बारकाईने तपासणी करुन नागरिकांना प्रमाणपत्रे दिली.त्यांना आरोग्य सहाय्यक मिलींद इंदवे, बाळासाहेब यादव,आरोग्य सेवक आकाश वरवटे, जगदीश पाटील,आरोग्य सेविका स्नेहल जोरवर, सुजाता आंबरे,डाटा एंन्ट्री ऑपरेटर आकांक्षा भोर,आशा सेविका संध्या भालेराव,जयश्री नजान,वैशाली नजान आदींनी सहकार्य केले.
देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ज्या गावांमध्ये मुख्यमंत्री वयोश्री योजनेची शिबीरे होतील अशा सर्व ठिकाणी 65 वर्षांवरील नागरिकांनी सहभाग नोंदवावा.शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा.जेणेकरुन आपल्या आरोग्यासाठी योजनेचा लाभ होऊन निरोगी,आनंदी आयुष्य जगण्यास मदत होईल.
..... डॉ.संभाजी नांगरे