पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी-
मंगल कार्याचा दाता,भक्तांचा भाग्यविधाता,तुच कर्ता आणि करविता.निरोप देतो देवा आज्ञा असावी,चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी.आभाळ भरले होते तू येतांना,आता डोळे भरून आलेत तुला पाहुन जातांना.गणपती बाप्पा मोरया,मंगलमुर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या.झाडे लावा,झाडे जगवा,पर्यावरण वाचवा.प्लास्टीक मुक्त व्हा आदी घोषणा देत, लेझीम, झांज पथक,माझ्या पप्पांनी गणपती आनला,मोरया या गीतांवर ठेका धरत प्राचार्य बादशहा ताजणे,उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांच्या मार्गदर्शनानुसार, विभागप्रमुख तसेच कार्यक्रम प्रमुख यांच्या नियोजनानुसार
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ,राजूर येथे सत्यनिकेतन परिवार सांस्कृतिक पर्यावरण पुरक गणेशोत्सवाची सांगता मिरवनुक उत्साही वातावरणात संपन्न झाली.कार्यक्रमात पर्यावरण पूरक छत्री संकल्पना वापरून देश वाचवा असा संदेश हरीत सेनेने दिला.
या मिरवणूकी दरम्यान राजूरचे सपोनी दीपक सरोदे यांच्या नेतृत्वाखाली विजय फटांगरे,होमगार्ड नामदेव सोनवणे,उत्तम कदम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
याप्रसंगी राजुर गावच्या लोकनियुक्त सरपंच पुष्पाताई निगळे,अॅड.दत्तात्रय निगळे यांनी विद्यालयाचे प्राचार्य बादशाह ताजणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचा शेवट श्री.गणेशाची आरती घेऊन मूर्तीचे शाळेच्या टाकीमध्ये विसर्जन करण्यात आले.विद्यालयाच्या प्रांगणात भस्मासुराचे दहन सत्यनिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार यांच्या हस्ते दहन करण्यात आले.
दरम्यान पंचायत सिमितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता कचरे यांनी सर्वोदय विदयालय नेहमीच विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधनाचे कार्य करत आहे.पर्यावरण पुरक गणेश स्थापना,प्लास्टीकच्या भस्मासुराचे दहन निश्चितच तालुक्यासाठी आदर्श असल्याचे मत व्यक्त केले.
अॅड.दत्तात्रय निगळे यांनी विदयालयाचे प्राचार्य श्री.ताजणे सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला पर्यावरणपूरक गणेश उत्सव निश्चितच समाजासाठी दिशादर्शक असून यापुढील काळात देश वाचवायचा असेल तर सर्वांनी या उपक्रमाचा आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले.

